ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

नाशिकमध्ये भाजपच्या बंडखोराची माघार तरीही जळगावात शिंदेसेनेचे बंड कायम:विधान परिषदेचा गुंता सोडवणे एकनाथ शिंदेंच्या हाती

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हस्तक्षेप केल्यावर आणि मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, दादा भुसेंच्या मनधरणीनंतर भाजप बंडखोर प्रसाद हिरे, गोकुळ गितेंनी माघार घेतली. मात्र, जळगावातून शिंदेसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे ‘नॉट रिचेबल’ झाल्याने महायुतीच्या गोटात खळबळ उडाली आहे. जळगावमुळे नाशिकमध्ये ऐनवेळी दगाफटका होण्याची धास्ती शिंदेसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडेंना सतावत आहे. दरम्यान, सूत्रांनी सांगितले की, जळगावातील गुंता सोडवणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याच हाती आहे. त्यांच्या सूचनेवरून पालकमंत्री गुलाबराव पाटील शनिवारी बंडखोरी प्रकरणात अंतिम निर्णय घेतील, अशी शक्यता आहे. नुकसानीच्या भावनेने नुकसानीची भीती या निवडणुकीत मनपा निवडणुकीचा ‘खर्च’ निघेल, या मोठ्या आशेवर नाशिकमधील अनेक मतदार (नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य) होते. पण गिते, हिरेंच्या माघारीने मतदारांचा ‘भाव’ अचानक कोसळला. राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार, ‘लक्ष्मी दर्शना’चा आकडा दोनवरून थेट एकवर आल्याने मतदारांच्या अपेक्षांचा मोठा भंग झाला आहे. हे कधीही भरून न येणारे नुकसान असल्याची भावना अनेक नगरसेवक बोलून दाखवत आहेत. त्यांनी ही भावना मतदानात व्यक्त केली तर महायुतीचे नुकसान होऊ शकते, असे जाणकारांचे मत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर