ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

अचलपुरच्या दोनोडा शाळेत सुरु होणार सहावी, सातवीचा वर्ग:विद्यार्थी-पालकांच्या आंदोलनाला यश, सुमारे 30 विद्यार्थी होते शिक्षणापासून वंचित‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अचलपूर तालुक्यातील दोनोडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत यावर्षीपासून सहावी व सातवीचे वर्गदेखील सुरू होणार आहेत. इमारत पुरेशी नसल्यामुळे हे वर्ग गेल्या काही वर्षांपासून बंद करण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुमारे ८ किलोमीटरची पायपीट करून आसेगाव पूर्णा येथे जावे लागत होते. ही पायपीट थांबविण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी बुधवारी जिल्हा परिषदेवर धडक दिली. भीम ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष राजेश वानखडे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. दरम्यान, आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन सीईओ सत्यम गांधी यांनी यावर्षीपासून दोन्ही वर्ग सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. अचलपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या दोनोडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सध्या फक्त पहिली ते पाचवीपर्यंतचेच वर्ग सुरू आहेत. यापूर्वी येथे पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग होते. मात्र शाळेची इमारत जीर्ण झाल्याने काही वर्षांपूर्वी ती पडली. इमारत बांधकामास वेळ लागल्याने सहावी व सातवीचे वर्ग खोल्यांअभावी बंद करण्यात आले होते. परिणामी पाचवी उत्तीर्ण झालेले सुमारे ३० विद्यार्थी शिक्षणापासून वंचित झाले होते. त्यांना आसेगाव येथे जावे लागत होते. यावर्षी पाचवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या २५ आहे. सहावी उत्तीर्ण झालेल्यांची संख्या ३० आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना दोनोडा गावातच शिक्षण मिळावे, अशी मागणी यावेळी रेटण्यात आली. विद्यार्थ्यांना परिवहनाचे साधन नसल्याने विशेषतः मुली आसेगावला जाऊ शकत नाहीत. परिणामी त्या शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती आहे. ग्रामस्थ व पालकांनी गेल्या अनेक महिन्यांपासून शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तहसीलदार, खासदार यांना निवेदन देऊनही दाद मिळाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल खचले आहे, असे त्यांच्या निवेदनात नमूद आहे. पंचक्रोशितील विद्यार्थी होते प्रतीक्षेत; दर्जा वाढणार सांगवी, खैरी, वाठोणा, मुकिंदपुर, येवता या गावांतील विद्यार्थ्यांनादेखील दोनोडा येथेच शिकायला यावे लागते. यावर्षीपासून सहावी व सातवीचे वर्ग सुरू होत असल्याने या विद्यार्थ्यांचीही सोय होणार आहे. अशा प्रकारे यावर्षीपासून दोनोडाच्या शाळेला उच्च प्राथमिक शाळेचा दर्जा मिळणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर