ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

विदर्भाची पंढरी कौंडण्यपूरला अधिक मासानिमित्त भाविकांची अलोट गर्दी:वर्धा नदीवर पवित्र स्नान करून घेतले जातेय विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या तसेच आई रुक्मिणी मातेचे माहेर म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कौंडण्यापूर येथे सुरू असलेल्या अधिकमास व पुरुषोत्तम मास पर्वानिमित्त हजारो भाविक वर्धा नदीवर पवित्र स्नान करून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनाचा लाभ घेत आहेत. परिसरात यात्रेसदृश वातावरण निर्माण झाले असून वारकऱ्यांचा मेळा जमला आहे. १७ मे पासून सुरू झालेल्या या धार्मिक पर्वात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महाअभिषेक, महाआरती, श्रीमद्भागवत कथा, पारायण, हरिपाठ, कीर्तन तसेच वारकरी आणि महिला भजनी मंडळांच्या भजनांचे कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्यात येत आहेत. २७ मे रोजी झालेल्या कमला एकादशी निमित्त हजारो वारकरी, महिला भक्त आणि भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. संस्थानतर्फे दर्शनासाठी उत्तम नियोजन करण्यात आल्याने भाविकांना शिस्तबद्ध रांगेतून दर्शन घेता आले. अधिकमासाच्या निमित्ताने कौंडण्यापूर नगरीला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले असून विविध वस्तू, कृत्रिम दागिणे, पोशाख, खाद्य पदार्थांची तसेच धार्मिक साहित्याची विक्री करणारी दुकाने परिसरात थाटण्यात आली आहेत. पंचक्रोशीतील तसेच परिसरातील अनेक गावांमधून भाविक मोठ्या संख्येने येथे येत असून वर्धा नदीत स्नान करून श्री विठ्ठल-रुक्मिणी, अंबिका देवी, शिव मंदिर, गजानन महाराज मंदिर आणि अवधूत महाराज मंदिर येथे दर्शन घेत आहेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परतूर, सातोना बु., उस्मानपूर, सालगाव, रेवलगाव, आष्टी, शिवाजीनगर, फुलवाडी, दतानगर, हिस्सी, मापेगाव, चांदेश्वर, गुळखंड, देवनांदा, दाकेफळ, वाकी, धनेगाव, धामणगाव, कावजवळा आणि खांडवी आदी गावांतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. या धार्मिक सप्ताहाची सांगता १ जून रोजी दुपारी १२ वाजता ह.भ.प. माऊली महाराज राऊत सालगावकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय दीपोत्सव, हरिकीर्तन, भागवत ज्ञानयज्ञ आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. या धार्मिक सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी ह.भ.प. माऊली महाराज सालगावकर तसेच ग्रामस्थ आणि सेवेकऱ्यांचे विशेष योगदान लाभले आहे. कौंडण्यपुरात भरलीया यात्रा ः कौंडण्यपुरात सध्या पुरुषोत्तम मासानिमित्त जत्रा भरली आहे. मागील सुमारे एक महिन्यापासून येथे सातत्याने भाविक दर्शन व पवित्र स्नानासाठी येत असल्यामुळे या तीर्थस्थळाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. काहीजण नौकायन करीत असून काही जण येथील प्रसिद्ध कच्चा चिवडा खाण्याचा आनंद घेत आहेत. बालगोपालही येथे खेळण्याचा येथील पाळण्यांवर सैर करण्याचा आनंद घेत असून थंड पेय, झुणका भाकर, फरसाण, जेवणाची थाळी, विविध प्रकारच्या मिठाई, खेळणी, महिलांचे पोशाख, पूजेचे साहित्य, भांडी अशी विविध दुकाने येथे थाटण्यात आल्यामुळे खरेदीसाठीही भाविकांची चांगलीच गर्दी होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर