ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

‘बामुक्टो’चा आंदोलनाचा इशारा!:संभाजीनगरच्या विद्यापीठातील पीएच.डी. घोटाळा, संशोधन अनुदान आणि भेदभावाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी-केंद्रित व न्याय्य धोरण स्वीकारून शैक्षणिक, संशोधन व प्राध्यापक हिताच्या प्रलंबित प्रश्नांचे त्वरित निराकरण करावे, या मागणीसाठी ‘बामुक्टो’ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाविद्यालयीन प्राध्यापक संघटना) आक्रमक झाली आहे. संघटनेच्या वतीने मा. कुलगुरूंना विविध न्याय्य मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले असून, मागण्या तातडीने मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. विद्यापीठातील पीएच.डी. घोटाळा, संशोधन अनुदान आणि भेदभावाचा मुद्दा ‘बामुक्टो’ने ऐरणीवर आणला आहे. पीएच.डी. संदर्भात विद्यापीठाची भूमिका संशयास्पद? विद्यार्थ्यांच्या हिताकडे लक्ष वेधताना बामुक्टोने पीएच.डी. संदर्भातील अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने: महाविद्यालयीन प्राध्यापकांवर अन्याय व भेदभाव थांबवा! विद्यापीठ कॅम्पस मधील प्राध्यापक आणि उप-केंद्रे किंवा संलग्न महाविद्यालयांतील प्राध्यापक यांच्यात विद्यापीठ प्रशासन दुजाभाव करत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. संशोधक मार्गदर्शक (गाईड) मान्यता महाविद्यालयीन प्राध्यापकांना यापूर्वी देण्यात आलेली पीएच.डी. संशोधक मार्गदर्शक मान्यता कायम ठेवण्यात यावी. कॅम्पसवरील प्राध्यापकांप्रमाणेच महाविद्यालयीन प्राध्यापकांनाही संशोधक विद्यार्थी देण्यात यावेत, जेणेकरून हा भेदभाव संपेल, असा दावा निवेदनात केला आहे. संशोधन अनुदान (Research Grant) विद्यापीठ निधीतून कॅम्पसवरील प्राध्यापकांना ज्या धर्तीवर संशोधन अनुदान दिले जाते, त्याच धर्तीवर महाविद्यालयीन प्राध्यापकांनाही किमान १,००,०००/- रुपये संशोधन अनुदान देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. समित्यांमध्ये डावलले विद्यापीठाच्या विविध समित्यांवर नियुक्त्या करताना महाविद्यालयीन प्राध्यापकांना जाणीवपूर्वक डावलले जात असून, हा भेद मिटवण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक पावले उचलावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिसभेचे (सिनेट) ठराव रद्द करण्यावर आक्षेप अधिसभेमध्ये (सिनेट) सर्वसंमतीने पारित झालेले प्राध्यापक हिताचे ठराव कोणत्या अधिकाराखाली रद्द करण्यात आले, याचे स्पष्टीकरण विद्यापीठ प्रशासनाने द्यावे, अशी मागणी करत जाणीवपूर्वक प्राध्यापकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न थांबवण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. तसेच, विद्यापीठ कायद्यानुसार महाराष्ट्र शासनाने तयार केलेल्या परिनियमांच्या (Statutes) अंमलबजावणीची सद्यस्थिती विद्यापीठाने जाहीर करावी, असेही म्हटले आहे. परीक्षा व सुट्ट्यांचे सुयोग्य नियोजन करा शैक्षणिक सत्रांचे विस्कळीत झालेले वेळापत्रक रुळावर आणण्यासाठी सर्व शैक्षणिक सत्रे व परीक्षा एप्रिल महिन्यातच पूर्ण होतील, असे सुयोग्य नियोजन करावे. मात्र, हे नियोजन करताना प्राध्यापकांच्या हक्काच्या सुट्ट्यांवर परिणाम होणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. याचबरोबर, उत्तरपत्रिका मूल्यांकन करणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनात तातडीने वाढ करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलनाचा भडका उडणार! “विद्यापीठ प्रशासनाने या सर्व मागण्यांवर साकल्याने व सकारात्मक विचार करून तातडीने अंमलबजावणी करावी, अन्यथा विद्यार्थी, शिक्षण आणि प्राध्यापक हितासाठी बामुक्टोला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल,” असा थेट इशारा संघटनेने दिला आहे. या निवेदनावर बामुक्टोचे अध्यक्ष डॉ. बप्पासाहेब म्हस्के, सचिव डॉ. मारोती तेगमपुरे, उपाध्यक्ष प्रा. डॉ. शर्मा शेष, अधिसभा सदस्य डॉ. उमाकांत राठोड आणि बीड जिल्हा अध्यक्ष डॉ. रामहरी मायकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. संबंधित वृत्त प्राध्यापकभरतीचा शासन निर्णय रद्द करा:’बामुक्टो’ प्राध्यापक संघटनेची CM देवेंद्र फडणवीसांकडे मागणी, अन्यथा लढा उभारण्याचा इशारा विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करा:अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ‘बामुक्टो’ प्राध्यापक संघटनेची CM देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर