ब्रेकिंग न्यूज
⚡ स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ✦ ⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर
SP News Maregaon

पुरुषोत्तम मासात 101 तेजस्विनी बालिकांचा वैदिक संस्कार यज्ञ:एकादश-कुंडीय दिव्य संकल्प यज्ञाने भारावले वातावरण‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


माहेश्वरी समाज ट्रस्ट, बालिका सशक्तिकरण अभियान व संस्कृती संवर्धन संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पुरुषोत्तम मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘तेजस्विनी आर्या वीरांगणा संस्कार संकल्प यज्ञा’चा भक्तिमय वातावरणात समारोप झाला. या उपक्रमात १०१ तेजस्विनी माहेश्वरी बालिकांनी सलग सात दिवस पहाटे वैदिक मंत्रोच्चार, ईश्वरस्तुती, प्रार्थना आणि उपासनेसह एकादश-कुंडीय यज्ञात सहभाग घेत संस्कारमय वातावरण निर्माण केले. या यज्ञाचे ब्रह्मत्व दिल्ली येथील वेदज्ञ विदुषी श्रद्धेय डॉ. श्रुतिकीर्तिजी यांनी केले. विशेष म्हणजे, केवळ बालिकांनी कंठस्थ वेदमंत्रांचे सस्वर पठण करत विधिवत आहुती अर्पण केल्याने उपस्थितांना भारतीय संस्कृतीच्या वैभवाची अनुभूती मिळाली. संपूर्ण परिसर वैदिक ऊर्जा, गायत्री मंत्राच्या घोष आणि यज्ञकुंडातील पवित्र धुराने भारावून गेला होता. कार्यक्रमाला माहेश्वरी समाज ट्रस्टचे अध्यक्ष विजय तोष्णीवाल, प्रधान मंत्री विजय राठी, प्रमुख अतिथी विनोद तोष्णीवाल, प्रादेशिक अध्यक्षा नीलिमा मंत्री यांच्यासह समाजातील विविध मान्यवर, मातृशक्ती, पालक, पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनीही गायत्री मंत्राच्या घोषात सहभागी होत यज्ञात आहुती अर्पण केली. यज्ञमहिमेचे महत्त्व स्पष्ट करताना डॉ. श्रुतिकीर्तिजी म्हणाल्या, यज्ञ हा मानवकल्याणाचा सर्वोत्तम मार्ग आहे. यज्ञामुळे पर्यावरण शुद्ध होते, मनाला सकारात्मक ऊर्जा मिळते आणि समाजात सद्भावना निर्माण होते. भारतीय संस्कृतीतील पंचमहायज्ञ परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. या यज्ञाचे ब्रह्मत्व दिल्ली येथील वेदज्ञ विदुषी श्रद्धेय डॉ. श्रुतिकीर्तिजी यांनी केले. ‘तेजस्विनी आर्या वीरांगणा संस्कार संकल्प यज्ञा’चा भक्तिमय वातावरणात समारोप झाला. या उपक्रमात १०१ तेजस्विनी माहेश्वरी बालिकांनी सलग सात दिवस पहाटे वैदिक मंत्रोच्चार, ईश्वरस्तुती, प्रार्थना याप्रसंगी अकोला, खामगाव, मूर्तिजापूर, वानखेड, धामणगाव, नांदेड, तिरोडा, पुणे, नागपूर व रायपूर येथून सहभागी झालेल्या तेजस्विनी आर्या वीरांगनांनी भारतीय संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याचा संकल्प व्यक्त केला. बालिकांमध्ये आत्मविश्वास, शिस्त, संस्कार आणि नेतृत्वगुण विकसित व्हावेत, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. यज्ञ संचालनासाठी व्यायामाचार्य पं. शैलजी बिलासपूर, आर्यवीरा हर्षिता बैतूल, प्रशिक्षक भुवनेश्वर व शेखर यादव रायपूर यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ट्रस्टचे विश्वस्त, संयोजिका, सदस्य व संरक्षक यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने मान्यवर, पालकांसह परिसरातील इतर नागरिकांचा यावेळी समावेश होता. संस्कार, संस्कृती अन् आत्मविश्वासाचा संगम ‘तेजस्विनी आर्या वीरांगणा संस्कार संकल्प यज्ञ’ या उपक्रमातून बालिकांमध्ये वैदिक संस्कार, भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. सात दिवस चाललेल्या या उपक्रमात बालिकांनी वेदमंत्र, प्रार्थना, उपासना आणि यज्ञविधी आत्मसात केले. आधुनिक काळात संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. विविध शहरांतून सहभागी झालेल्या बालिकांनी ‘पंचमहायज्ञ परंपरा जपत संस्कृतीचे संवर्धन करू’ असा संकल्प केला. यज्ञामुळे पर्यावरण शुद्धीकरणासह मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळते, असा संदेशही या कार्यक्रमातून देण्यात आला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर