ब्रेकिंग न्यूज
⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शिवाजी पार्कची दोस्ती, ‘नटसम्राट’ पाहून ढसाढसा रडला होता 1983 च्या वर्ल्ड कपचा हिरो! नाना पाटेकरांच्या क्रि… ✦ ⚡ शेताच्या बांधावरून थेट रुपेरी पडद्यावर! वेगावच्या अजय बदकी यांची ‘हुंकार’मधून दमदार एन्ट्री! ✦ ⚡ शेतकरी ते यशस्वी उद्योजक, नाशवंत भाजीपाल्याने पालटलं नशीब, आता महिन्याला 2 लाखांची कमाई ✦ ⚡ दुष्काळात बीडच्या शेतकऱ्यानं करून दाखवलं, 500 रुपयांच्या खर्चात मिळवलं तब्बल 32 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन, … ✦ ⚡ लेकीच्या सुखासाठी कर्ज काढलं, पण जावई निघाला…, लग्नानंतर 4 महिन्यांत सगळं संपलं, संजनाचा आईला शेवटचा फोन … ✦ ⚡ Pawanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाला नवं वळण! पद्मसिंह पाटलांचा पाय खोलात? CB… ✦ ⚡ CRIME : फेसबूक LIVE सुरू असताना थरारक हत्याकांड! मेडिकल स्टोअरबाहेर पेटला वाद अन् ‘स्टिंग ऑपरेशन’ करताना झा… ✦ ⚡ Success Story : शेती करावी तर अशी, तीन पिकातून बीडच्या शेतकऱ्याचं पालटलं नशीब, वर्षाला 8 लाख कमाई, Video
SP News Maregaon

मोदींवर विनाकारण टीका नको, पवारांचे विधान महत्त्वाचे:विधान परिषद महायुती एकत्रित लढणार, इंधनाचा तुटवडा नाही, जनतेने घाबरू नये- सीएम फडणवीस

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवरून होणाऱ्या टीकेचा समाचार घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विधानाचा दाखला दिला आहे. पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यांवर अनेक महत्त्वाचे करार करत असून, त्यामुळे देशाचे भवितव्य सुरक्षित झाले आहे. म्हणूनच पंतप्रधानांवर विनाकारण टीका करू नका, ते देशाच्या हिताचे काम करत आहेत असे शरद पवारांनी म्हटले होते आणि त्यांचे हे विधान अत्यंत महत्त्वाचे आहे,असे फडणवीस म्हणाले. याचवेळी राहुल गांधींवर टीका करताना ते म्हणाले की, राहुल गांधी हे रिजेक्टेड माल आहेत. मी मागच्या वेळी त्यांच्यावर अशी टीका केली तेव्हा शरद पवारांना राग आला होता आणि मुख्यमंत्र्यांनी असे शब्द वापरू नयेत, असा सल्ला त्यांनी दिला होता. विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या ऐक्यावर भर दिला. महायुतीमधील तिन्ही पक्षांनी ही निवडणूक एकत्रितपणे लढली पाहिजे, असे आमचे स्पष्ट मत आहे. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र बसून जागावाटप आणि रणनीतीवर योग्य निर्णय घ्यावा, असा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. पेट्रोल-डिझेलचा तुटवडा नाही सीएम फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारकडे पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे जनतेने विनाकारण घाबरून जाण्याचे (पॅनिक होण्याचे) कारण नाही. जेव्हा लोक अफवांवर विश्वास ठेवून गरजेपेक्षा जास्त पेट्रोल भरू लागतात, तेव्हा इंधनाची सप्लाय चेन तात्पुरती विस्कळीत होते. याचा अर्थ साठा संपला असा होत नाही. जागतिक परिस्थिती बिकट असतानाही केंद्र सरकारने आपली पुरवठा साखळी मजबूत ठेवली आहे. त्यामुळे नागरिकांनी इंधनाचा गैरवापर टाळावा आणि अफवांना बळी पडू नये. पोलिसांच्या इंधन पुरवठ्यात कोणतीही कमतरता नाही पोलिस वाहनांना पेट्रोल मिळत नसल्याच्या चर्चेचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी खंडन केले. पोलिसांसाठी सर्व ठिकाणी पुरेशा प्रमाणात पेट्रोल-डिझेल उपलब्ध आहे. नागपूरमध्ये घडलेल्या एका घटनेचा उल्लेख करत ते म्हणाले की, नागपूरमध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याने पेट्रोल शिल्लक असतानाही अत्यंत चुकीचे उत्तर दिले होते. या बेजबाबदार वर्तनामुळे संबंधित कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्यात आली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर