ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

दिव्य मराठी एक्स्पोज:नाशिकच्या संस्थेचे काम पिशव्या शिलाईचे, मात्र ठेका मिळवला चक्क कांदा खरेदी करण्याचा, खोटे अनुभव प्रमाणपत्र, बँकेचे नियम धाब्यावर

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


केंद्र सरकारने कांद्याचे कोसळणारे भाव रोखण्यासाठी व शेतकऱ्यांना आश्वासित किंमत मिळावी यासाठी ‘नाफेड’तर्फे कांदा खरेदी सुरू केली. प्रत्यक्षात ज्या संस्थांना नाफेडने हे काम दिले त्या संस्थांचे गौडबंगाल ‘दिव्य मराठी’ने उघड केले. या संस्थांचे पत्ते शोधले असता काही ठिकाणी बंद गाळे सापडले. काही ठिकाणी कापडी पिशव्या शिवण्याचा अनुभव असलेल्या संस्थेला कांदा खरेदीचा ठेका दिल्याचे वास्तव पुढे आले. तसेच बंद पडलेल्या सहकारी संस्थांनाच टक्केवारी देऊन या ठेक्यासाठी वापरल्याचे त्यातून पुढे येत आहे. विशेष म्हणजे सहकार विभागाचे अधिकृत लेखापरीक्षकच या घोटाळ्यात सामील असल्याचे स्पष्ट झाले आहे. कांदा खरेदीचा अनुभव नसताना कापडी पिशव्या बनवण्यासाठी स्थापन झालेल्या स्त्री शक्ती महिला अटल सहकारी संस्थेला नाफेडने कांदा खरेदीचा ठेका दिल्याचे उघडकीस आणले. विशेष म्हणजे या संस्थेच्या अध्यक्षा दीपाली वसंत कुलथे या सहकार विभागाच्या अधिकृत लेखापरीक्षक असल्याचेही समोर आले आहे. नाफेडला 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे लक्ष्य देण्यात आले होते. मात्र 1 जूनपर्यंत फक्त 15 मेट्रिक टन कांदा नाफेडकडून खरेदी झाला आहे. वैयक्तिक टेंडर घेतले आहे आमची संस्था महिलांसाठी काम करते. प्लास्टिक मुक्तीसाठी कापडी पिशव्या शिवते. याअगोदर वैयक्तिक टेंडर घेतले आहे. ऑफिसला या, माहिती देतो. – सुदाम निकम,सचिवांचा पती,स्त्री शक्ती महिला संस्था लेखापरीक्षण अहवाल तपासले नाही नाफेडने कांदा खरेदीसाठी ज्या सोसायट्यांना ठेका दिला त्या अवसायनात निघालेल्या नाहीत ना याची आम्ही तपासणी केली. अनुभव, लेखापरीक्षण अहवाल हे तपासले नाही. -संदीप जाधव, जिल्हा उपनिबंधक खोटी कागदपत्रे असल्यास ठेका रद्द करू शेतकऱ्यांना खरेदी केंद्राची माहिती व्हावी यासाठी जनजागृती करत आहोत. सोसायट्यांनी खोटी कागदपत्रे सादर करत ठेका घेतल्याचे दिसल्यास नाफेडला सांगून तो रद्द करू. -केदा आहेर, संचालक पत्ता नाशिकचा, कंपनी बागलाणची, शेतकरी परराज्यातले गेल्या वर्षी नाफेडतर्फे फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना कांदा खरेदीचे ठेके देण्यात आले होते. त्यातील एक कंपनी होती बागलाण फार्मर प्रोड्युसर कंपनी. बंद पडलेल्या या कंपनीचा शोध ‘दिव्य मराठी’ने घेतला असता ना कंपनी सापडली ना तिचे संचालक. ऑडटिरनेच घेतले नाफेडचे ठेके पिशव्या शिवणाऱ्या संस्थेला ठेका ठेका मिळालेल्या रेणुका अटल कृषी नावीन्यपूर्ण सहकारी संस्थेचा पत्ता शोधत ‘दिव्य मराठी’ची टीम चांदवडला पोहोचली. बाजार समितीच्या आसपास या संस्थेच्या खरेदीबाबत कोणताही फलक नव्हता. खरेदी शोधत आम्ही पोहोचलो 500 मीटर अंतरावरच्या हायवे कॉम्पलेक्सपाशी. ठेका दिलेल्या संस्थेचा पत्ता याच कॉम्प्लेक्समधील आहे. पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी रेणुका अटल कृषी सहकारी संस्थेचा ना कोणता बोर्ड होता ना कोणती खरेदी सुरू होती. सरकारी योजनांसाठी प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून देणाऱ्या व्यक्तीचे हे कार्यालय होते. दिपाली कुलथे वैष्णवी संस्थेच्या होत्या लेखापाल दिपाली कुलथे या महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाच्या प्रमाणित लेखा परीक्षक आहेत. त्यांनी वैष्णवी अटल नावीन्यपूर्ण बहुद्देशीय सहकारी संस्थेचे ऑडिट केले आहे. या संस्थेला नाफेडतर्फे सध्या कांदा खरेदीचा ठेका देण्यात आला आहे. स्त्री शक्ती महिला अटल संस्थेच्या नावे घेतला ठेका याच दिपाली कुलथे स्त्री शक्ती महिला अटल सहकारी संस्थेच्या अध्यक्ष आहेत. पिशव्या शिवणे, पापड तयार करणे यासह अनेक उद्देशांसाठी ही स्थापन करण्यात आली. संस्थेच्या सीईओंना कांदा खरेदीचा अनुभव असल्याने हे काम घेतल्याचे कुलथे यांनी सांगिले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर