ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

संतांनी समाजाला सदाचार, अध्यात्म‎अन् मानवतेचा खरा मार्ग दाखवला‎:पाळधी येथील कीर्तनात संग्राम महाराज भंडारेंनी व्यक्त केले परखड मत

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पाळधी संतांनी समाजाला अध्यात्म, सदाचार आणि मानवतेचा मार्ग दिला, तर शूरवीरांनी धर्म, स्वराज्य आणि स्वाभिमानाचे रक्षण केले. संत आणि शौर्य परंपरेच्या संस्कारांमुळेच महाराष्ट्राची संस्कृती व अस्मिता आजही तेजस्वी आहे, असे मत संग्राम महाराज भंडारे यांनी आवर्जून व्यक्त केले आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अभीष्टचिंतनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात पाचव्या दिवसाची कीर्तन सेवा देताना संग्राम महाराजांनी पालकमंत्र्यांच्या संत, संस्कृती आणि समाजकार्याप्रती असलेल्या जिव्हाळ्याचाही गौरवपूर्ण उल्लेख केला. ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी संतांच्या विचारांतून प्रेरणा घेत स्वराज्याची उभारणी केली. आजच्या नेतृत्वानेही संतविचार, नैतिक मूल्ये आणि लोकसेवेचा आदर्श स्वीकारण्याची गरज आहे. संग्राम महाराज भंडारे यांनी संत तुकोबारायांची पवित्र पगडी व आळंदी वर्णाचे उपरणे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र प्रताप पाटील यांना भेट दिले. कीर्तन महोत्सव पाळधी येथील जीपीएस ग्रुप व जळगाव येथील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील आणि विक्रम पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित राज्यस्तरीय या कीर्तन महोत्सवाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर