ब्रेकिंग न्यूज
⚡ Someshwar Karkhana Election: सोमेश्वर कारखान्याच्या सत्तेचा आज फैसला! सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार की बंडख… ✦ ⚡ जलसंधारणातून फुलविली शाश्वत शेती; कैलास डोंगरकरांचा प्रयोग ठरतोय आदर्श! ✦ ⚡ तुळजापूरला ज्योत आणायला गेले अन् मृत्यूमुखी पडले, भरधाव कंटेनरने दुचाकीला 5 KM फरपटत नेलं, 3 उमद्या तरुणांच… ✦ ⚡ निसर्गाच्या कुशीत दडलेला पांडवदेवीचा आध्यात्मिक ठेवा! नवरात्रोत्सवासाठी तिवसाळा (जळका) येथील देवस्थान सज्ज ✦ ⚡ बी.फार्मसीचं शिक्षण घेतलं अन् दोन एकरात केला वेगळा प्रयोग, कष्टाला फळ आलं, पण सगळं ‘पाण्यात’ गेलं, Video ✦ ⚡ Abhijeet Dipke On Gyanesh Kumar | ‘ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेणारच!’ | Delhi CJP Potest News ✦ ⚡ Suryakumar Yadav : गेम कोण फिरवणार तर गुड्डू! LIVE मॅच सुरू असताना सूर्याची भविष्यवाणी; पत्नीने थेट शेअर के… ✦ ⚡ Pune MPSC Protest News | MPSC आंदोलनात विद्यार्थ्यांचा उद्रेक! नाशिकवरूनही विद्यार्थी पुण्यात दाखल ✦ ⚡ भारतातच नाही, पाकिस्तानातही नानांचे चाहते! अश्रू थांबत नाहीत म्हणत माजी क्रिकेटपटूनं शेअर केला VIDEO ✦ ⚡ ‘अमावस्ये’पर्यंत तक्रार मागे घे नाहीतर…, भोंदू बाबाच्या चेल्यांचं भयंकर कांड, फलटण प्रकरणात शॉकिंग अपडेट
SP News Maregaon

भाई का बड्डे! कुख्यात गुन्हेगार तुरुंगात, टोळीचं भयंकर कांड, कारागृहाच्या भिंतीवरच…, Video व्हायरल होताच …

10 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जळगाव: खुनाच्या गुन्ह्यात बंदिस्त असलेल्या आकाश सपकाळे याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी काहींनी थेट जळगावचे जिल्हा कारागृह गाठले. तसेच कारागृहाच्या संरक्षक भिंतीवरच रात्रीच्या वेळी फटाके फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी विक्की गणेश शिंदे ऊर्फ छोटा माया आणि शुभम जाधव या दोघांना अटक केली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं घडलं काय?

जळगाव कारागृहाच्या भिंतीजवळ रात्रीच्या वेळी फटाके फोडण्यात आले होते. या फटाक्यांच्या ठिणग्या कारागृहाच्या आत गेल्या होत्या. त्यामुळे कॅन्टिनमधील मालमत्तेचे नुकसान झाले, तर कैद्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला होता. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर जिल्हा पेठ पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघांना बेड्या ठोकल्या.

आधी मैदानावर भेटला, मग प्रेमाचं नाटक आणि शेवटी…, महिला पोलिसासोबत नको ते घडलं, पतीच्या डिमांडनं हादरवून सोडलं

मित्राचा वाढदिवस म्हणून फोडले फटाके

पोलीस चौकशीतून याप्रकरणात धक्कादायक वास्तव समोर आले. आकाश सपकाळे हा खुनाच्या गुन्ह्यात 2021 पासून जळगाव जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. यापूर्वीच त्याच्यावर नऊ गुन्हे दाखल आहेत. अशा परिस्थितीत त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी विक्की गणेश शिंदे उर्फ छोटा माया, शुभम राहुल जाधव, विकास उर्फ गुड्ड्या संतोष भालेराव, विशाल गोसावी आणि गौरव उर्फ बंटी गौतम सपकाळे हे मध्यरात्री जिल्हा कारागृहाच्या परिसरात पोहोचले.

रात्री पोलिसांनी हटकताच पसार

कारागृहाच्या संरक्षक भिंतीजवळ पाच जणांनी फटाके फोडून वाढदिवस साजरा केला. रात्रीच्या वेळी कारागृहाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असलेल्या ठिकाणी हा प्रकार सुरू असताना तो कर्तव्यावर असलेल्या कारागृह कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आला. कर्मचाऱ्यांनी त्यांना हटकताच सर्वजण तेथून पसार झाले.

कारागृह प्रशासनाकडून गंभीर दखल

फटाके फोडल्यामुळे उडालेल्या ठिणग्या संरक्षक भिंतीच्या आत गेल्या. त्यामुळे कारागृहातील कॅन्टीनमधील मालमत्तेचे नुकसान झाले. तसेच फटाक्यांमुळे कारागृहातील बंदींच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने कारागृह प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. तुरुंग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यातील संशयितांची ओळख पटवली.

घडलेल्या प्रकाराची माहिती वरिष्ठ तुरुंग अधिकारी ज्ञानेश्वर चव्हाण यांना देण्यात आली. त्यानंतर कारागृह प्रशासनाकडून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विक्की गणेश शिंदे उर्फ छोटा माया तसेच त्याचे साथीदार शुभम राहुल जाधव यांना ताब्यात घेण्यात आले.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपींची दहशत कमी व्हावी आणि कायदा हातात घेणाऱ्यांना स्पष्ट संदेश जावा, यासाठी जिल्हापेठ पोलिसांनी आरोपींची शनीपेठ परिसरातून धिंड काढली.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर