ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

पुण्यात टोळीयुद्ध पेटले!:माजी नगरसेवक आंदेकर हत्येचा बदला, मुख्य आरोपीच्या भावाची गोळ्या झाडून अन् कोयत्याने वार करत निर्घृण हत्या

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुणे शहरात टोळीयुद्धाने पुन्हा हिंसक वळण घेतले आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपीच्या भावाची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना बालाजी नगर परिसरात घडली असून, शहरात खळबळ उडाली आहे. मृत तरुणाचे नाव अक्षय बापू म्हस्के उर्फ बाळा (वय 26, रा. आंबेगाव पठार, पुणे) असे आहे. हल्लेखोरांनी बालाजी नगर येथे दबा धरून अक्षयवर जवळून गोळ्या झाडल्या. त्याला तीन गोळ्या लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर त्याच्या तोंडावर आणि डोक्यात धारदार कोयत्याने वारही करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, अक्षय म्हस्केवर यापूर्वी तीन वेळा जीवघेणे हल्ले झाले होते, परंतु तो त्यातून बचावला होता. मात्र, चौथ्या हल्ल्यात हल्लेखोरांनी त्याचा खून केला. मृत अक्षय म्हस्के हा वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आकाश म्हस्के याचा सख्खा भाऊ आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येत आकाश म्हस्केने महत्त्वाची भूमिका बजावली होती. हत्येसाठी लागणारे पिस्तूल त्याने मध्य प्रदेशातून पुण्यात आणले होते. आकाश म्हस्के हा वनराज आंदेकर खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ उर्फ सोमा गायकवाड याचा विश्वासू साथीदार मानला जातो. आंदेकर यांच्या हत्येचा कट रचण्यात, त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आणि ‘फिल्डिंग’ लावण्यात सोमा गायकवाड व आकाश म्हस्के यांचा सहभाग होता. त्यानंतर आंदेकरांवर गोळीबार करून कोयत्याने वार करत त्यांची हत्या करण्यात आली होती. आकाश म्हस्के सध्या कारागृहात आहे. त्याच्या कृत्याचा सूड घेण्यासाठी आंदेकर टोळीच्या सदस्यांनी त्याचा भाऊ अक्षय म्हस्केला लक्ष्य केले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेमुळे पुणे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर