ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

महायुती सरकारचे महामंडळ वाटप ठरले:48-29-23 चा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती; वाचा कुणाच्या वाट्याला किती जागा?

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचे महामंडळ वाटप अखेर निश्चित झाले आहे. या प्रकरणी महायुतीच्या घटकपक्षांत 48-29-23 चा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार, हे वाटप महिन्याभरात होण्याची शक्यता आहे. महायुती सरकार सत्तेत आल्यापासून घटक पक्षांचे नेते व पदाधिकारी महांडळांच्या वाटपाकडे डोळे लावून बसले आहेत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेऊन महामंडळ वाटपाचा तिढा सोडवला आहे. त्यांनी भाजप व मित्रपक्षांच्या नेत्यांना महामंडळांचे वाटप लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यात. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या महिन्याभरात राज्यातील महामंडळांचे वाटप पूर्ण होईल. या प्रकरणी महायुतीचा फॉर्म्युलाही ठरला आहे. त्यानुसार, भाजपला सर्वाधिक 48 टक्के, तर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला अनुक्रमे 29 व 23 टक्के महामंडळे मिळतील. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री करणार शिक्कामोर्तब महायुतीत महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. पण कोणत्या पक्षाला कोणते महामंडळ मिळणार? हे अद्याप ठरले नाही. पुढील काही दिवसांत यावर महायुतीच्या घटकपक्षांत धीरगंभीर चर्चा होईल. त्यानंतर हा मुद्दाही निकाली निघेल. महायुतीच्या पुढील बैठकीत महामंडळातील सदस्य वाटप होईल. त्यानंतर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महामंडळ वाटपाच्या यादीवर अंतिम शिक्कामोर्तब होईल. तद्नंतर तिन्ही पक्षांचे नेते कोणत्या महामंडळावर कुणाची वर्णी लावायची याचा निर्णय घेतली. त्यासाठी अनेक नेते व पदाधिकारी आपापल्या परीने फिल्डिंग लावत आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे राज्यात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी पुढील महिन्यात 17 जून रोजी निवडणूक होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध झाल्यास महामंडळ वाटपाच्या प्रक्रियेला अधिक गती येण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, महायुतीचे नेते व कार्यकर्त्यांकडून आतापासूनच महामंडळांवर आपली वर्णी लावून घेण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस सत्ताधारी पक्षांमधील राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता आहे. हे ही वाचा… वाल्मीक कराडची प्रकृती खालावली:मागील 3 दिवसांपासून सलाईनवर, वेळेत योग्य उपचार न मिळाल्यास यकृत निकामी होण्याचा धोका
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी गजाआड असलेल्या वाल्मीक कराडची तुरुंगात प्रकृती ढासळल्याची मोठी माहिती समोर आली आहे. वाल्मीक कराड कारागृहात मागील 3 दिवसांपासून सलाईनवर आहे. त्याला वेळीच योग्य उपचार मिळाले नाही, तर त्याचे यकृत निकामी होण्याची शक्यता आहे, असे सांगितले जात आहे. त्यामुळे त्याला अंबाजोगाई स्थित स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलवण्याच्या हालचाली सुरू केल्या जात आहेत. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर