ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

हिंगोलीत खासदार नागेश पाटील आष्टीकरांच्या स्वागताचे झळकले बॅनर:जिल्ह्याच्या विकासासाठी योग्य निर्णय घेतला, आमदार संतोष बांगर यांची बॅनरबाजी

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हिंगोली लोकसभा मतदार संघातील ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या शिंदेसेनेतील स्वागताचे बॅनर झळकू लागले असून शहरातील सर्वाजनिक चौकांमधून आमदार संतोष बांगर यांनी बॅनर झळकवित जिल्हयाच्या विकासासाठी योग्य निर्णय घेतल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांमधून चांगलीच आग पाखड केली जात आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघाचे ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी लोकसभा निवडणुकीत शिंदेसनेचे बाबुराव कदम कोहळीकर यांचा पराभव करून हिंगोली जिल्हा ठाकरेगटाचा बालेकिल्ला असल्याचे दाखवून दिले. यावेळी मतदारांनीही आष्टीकर यांना भरभरून मतदान केले. त्यामुळे हिंगोली लोकसभेतील मतदारांना खासदर आष्टीकर यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मागील काहीदिवसांपासून ऑपरेशन टायगरने जोर पकडल्यानंतर खासदार आष्टीकर शिंदेसेनेत जाणार याची चाहूल ठाकरे गटांच्या नेत्यांना लागली होती. मात्र पत्रकार परिषदांमधून खासदार आष्टीकर यांनी यामध्ये कुठलेही तथ्य नाही आपण कुठेही जाणार नाही असे स्पष्ट केले होते. मात्र मागील दोन दिवसांपासून ते नॉट रिचेबल आहेत तर ठाकरे गटाच्या बैठकीला देखील त्यांनी दांडी मारली. त्यामुळे ते शिंदेसेनेत प्रवेश करतील किंवा वेगळा गट स्थापन करतील हे निश्‍चीत झाले होते. दरम्यान, मागील दोन दिवसांच्या राजकिय घडामोडी नंतर आज हिंगोली शहरात आमदार संतोष बांगर यांनी खासदार नागेश पाटील यांच्या स्वागताचे बॅनर झळकविले आहे. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने योग्य निर्णय घेतल्या बद्दल आपले हार्दिक अभिनंदन असे यामध्ये नमुद केले आहे. या पोस्टरबाजीमुळे खासदार आष्टीकरांचा लवकरच शिंदेसेनेत प्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे ठाकरेगटाच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार आष्टीकरांच्या विरोधात आगपाखड सुरु केली आहे. सेनगाव व गोरेगाव येथे त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तर खासदार आष्टीकर गद्दाल निघाला त्यांना जायचे होते तर राजिनामा देऊन जायचे असते. तसेच असे कितीही खासदार गेले तरी आम्ही पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याच पाठिशी असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर