ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

अजित पवार विमान दुर्घटना:’VSR व्हेंचर्स’ कंपनीचे विशेष ऑडिट होणार; 15 फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचे ‘डीजीसीए’चे आदेश

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भीषण विमान अपघातातील मृत्यूनंतर आता या दुर्घटनेच्या चौकशीने वेग घेतला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या प्रकरणाची गंभीर दखल घेत, अजित पवार ज्या कंपनीच्या विमानाने प्रवास करत होते, त्या ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ (VSR Ventures) कंपनीच्या विशेष ऑडिटचे आदेश दिले आहेत. या ऑडिटमध्ये कंपनीच्या सुरक्षेचे नियम आणि विमानांच्या देखभालीबाबतचे गंभीर प्रश्न समोर येण्याची शक्यता आहे. अजित पवार प्रवास करत असलेल्या ‘लिअरजेट ४५ एक्सआर’ या विमानाच्या अपघाताची सखोल चौकशी करण्यासाठी डीजीसीएने विशेष पथक नियुक्त केले आहे. या ऑडिटचा सविस्तर अहवाल १५ फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार आहे. कंपनीचे दैनंदिन कामकाज, वैमानिकांचे लॉगबुक्स आणि विमानांच्या देखभालीचे रेकॉर्ड्स तपासले जातील. कंपनीकडून विमानांची वेळोवेळी तांत्रिक तपासणी केली जात होती का आणि लॉगबूक भरताना पारदर्शकता होती का, यावर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे. अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू अजित पवार हे २८ जानेवारी रोजी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीला विमानाने जात होते. मात्र, बारामती विमानतळावर पायलटने लँडिंगचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर दुसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न केला. मात्र, याच वेळी विमानाला अपघात झाला आणि त्यात अजित पवारांसह इतर चार जणांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर या विमान अपघाताच्या सखोल चौकशीची मागणी केली जात आहे. सध्या ‘एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो’ (AAIB) या दुर्घटनेमागील वातावरणीय आणि तांत्रिक कारणांचा शोध घेत आहे. कंपनीचा वादग्रस्त इतिहास: युरोपियन युनियनची कारवाई दरम्यान, व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीचा वादग्रस्त इतिहास समोर आला आहे. युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीने (EASA) यापूर्वीच व्हीएसआर व्हेंचर्सला त्यांच्या हवाई क्षेत्रात प्रवेश नाकारला होता. याच कंपनीच्या एका विमानाचा (VT-DBL) सप्टेंबर २०२३ मध्ये मुंबईत अपघात झाला होता. त्याबाबत EASA ने विचारलेल्या प्रश्नांना कंपनी उत्तर देऊ शकली नव्हती. कंपनीने माहिती देण्यास टाळाटाळ केल्यामुळे १७ डिसेंबर २०२४ रोजी युरोपियन एजन्सीने या कंपनीचे ‘थर्ड कंट्री ऑपरेटर’ (TCO) ऑथरायजेशन रद्द केले होते. हे ऑथरायजेशन एका वर्षानंतर पुन्हा बहाल करण्यात आले होते. विशेष ऑडिटनंतर कंपनीवर बंदीची शक्यता आंतरराष्ट्रीय स्तरावर यापूर्वीच संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या कंपनीच्या विमानाने उपमुख्यमंत्र्यांचा प्रवास होणे, हा आता वादाचा विषय ठरू लागला आहे. या विशेष ऑडिटनंतर कंपनीवर कायमस्वरूपी बंदी किंवा दंड आकारला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर