ब्रेकिंग न्यूज
श्रावणात श्री क्षेत्र पांडवदेवीत भक्तांची अलोट गर्दी भाजपा मारेगाव शहर सरचिटणीसपदी रविंद्र टोंगे पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा; 15 वर्षीय मुलीसोबत घडणार होतं नको तेच, 15 जणांविरुद्ध गुन्हा पहाटे घराबाहेर पडताच तो मागे लागला; कॉलेजच्या वाटेत अडवलं अन् मुंबईत घडला भयंकर प्रकार IND vs SL Test : बॉलिंगने आग ओकणाऱ्या DSP सिराजचा बॅटिंगमध्ये जलवा; गगनचुंबी सिक्स पाहून श्रीलंका आवाक्, पा… पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी
SP News Maregaon

अन्नछत्र मंडळात दररोज 100 पेक्षा जास्त चालक-वाहकांची मोफत निवासाची सोय:जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कित्येक वर्षांपासून उपक्रम सुरु‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ वाहनतळ प्रांगणात दररोज ५० पेक्षा जास्त एसटी बस मुक्कामी राहत असून या एसटी बसचे चालक व वाहक असे १०० पेक्षा जास्त कर्मचारी यांची निवासाची व भोजनाची व्यवस्था मोफत कित्येक वर्षांपासून करण्यात येत आहे. याबद्दल चालक, वाहक व प्रवासी यांच्याकडून समाधान व्यक्त केले जात आहे. वेंगुर्ला, लांजा, कोल्हापूर, पुणे, मुंबई, ठाणे आदी लांब पल्ल्याच्या एसटी बस रात्री थेट अन्नछत्र मंडळात मुक्कामी येतात. सकाळी येथूनच त्या निघतात, यामुळे भाविकांची सोय होते. त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून मंडळात या सर्व चालक व वाहकाची राहण्याची व महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे. चालक वाहक अक्कलकोट मुक्कामी ड्युटी मागून घेत असून श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शन व अन्नछत्र मंडळात महाप्रसाद घेऊन तृप्त होत आहेत.सामाजिक बांधिलकी म्हणून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ वाहनतळ प्रांगणात दररोज ५० पेक्षा जास्त एस टी बस मुक्कामी राहत असून या एसटी बसचे चालक व वाहक असे १०० पेक्षा जास्त कर्मचारी यांची निवासाची व भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे. सुभेदार मळा येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या साडेपाच एकरातील भव्य जागेत एस टी बस व लक्झरी वाहनासाठी मोफत वाहनतळ व जेवणाची व राहण्याची सोय केली जात आहे. एस टी बस महामंडळ कर्मचाऱ्यांचे एवढे मोठे वाहनतळ एस टी स्टँड व्यतिरिक्त अन्नछत्र मंडळ वगळता कोठेही नसेल. स्वामी समर्थांच्या कृपाछत्राखालीच सर्व वाहक व चालक आहेत , अशा भावना आहेत. पायाभूत सुविधांनी पर्यटनाला नवी दिशा येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून आधुनिक पायाभूत सुविधांनी पर्यटनाला एक नवी दिशा दिली आहे. हजारो भाविक दिवसभरात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात महाप्रसाद घेतात. या महाप्रसादासोबतच न्यास विविध उपक्रम राबवित आहे. चालक-वाहकांसाठी नियमित सोय एसटी महामंडळ व कर्मचारी यांच्या समस्या मला माहित आहेत. चालक वाहक यांच्यासाठी अद्यावत निवासस्थान व महाप्रसादाची सोय नियमित केली जाते. जनमेजयराजे भोसले, संस्थापक अध्यक्ष, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर