ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

भिडेवाडा चित्ररथ अमरावतीत दाखल:मुलींच्या पहिल्या शाळेचा इतिहास इर्विन चौकात अनुभवता येणार

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुण्यातील मुलींची पहिली शाळा जिथे सुरू झाली, त्या ऐतिहासिक भिडेवाड्याचा चित्ररथ सध्या महाराष्ट्रभर फिरत आहे. हा ‘भिडेवाडा चित्ररथ’ बुधवार, २० मे रोजी अमरावतीत दाखल होणार असून, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने हा उपक्रम आयोजित केला आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी केलेल्या संघर्षाची माहिती नागरिकांना मिळणार आहे. अमरावतीकरांनी या चित्ररथाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे. इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हा चित्ररथ दिवसभर स्थानिक नागरिकांच्या दर्शनासाठी उपलब्ध राहील. महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी उपमहापौर डॉ. गणेश खारकर यांनी याविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, फुले दाम्पत्याने पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा उघडली. ही शाळा सुरू करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. फुले दाम्पत्याच्या त्यागामुळेच आज महिला सन्मानाने उभ्या आहेत. त्यांच्या द्विशतकीय शताब्दी वर्षानिमित्त हा उपक्रम राबवला जात असून, त्यामागील त्याग लोकांपर्यंत पोहोचवणे हा यामागचा उद्देश आहे. डॉ. खारकर यांनी पुढे सांगितले की, महात्मा फुले यांच्या शिक्षणक्रांती, स्त्रीशिक्षण, शेतकरी हक्क, अस्पृश्यता निर्मूलन आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा अधिकाधिक प्रचार-प्रसार व जनजागृती करणे हा या भिडेवाडा चित्ररथाचा मुख्य उद्देश आहे. या चित्ररथाच्या स्वागत, नियोजन आणि विविध सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी नुकतीच त्यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक पार पडली. या बैठकीला शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि परिवर्तनवादी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नियोजनानुसार, डॉ. खारकर आणि इतर पदाधिकारी नांदगाव पेठ येथून अमरावतीपर्यंत या रथासोबत येणार आहेत. पत्रकार परिषदेला प्रा. श्रीकृष्ण बनसोड, राजाभाऊ हाडोळे, तंत्र शिक्षक मानकर, प्रभाकर वानखडे, नितीन हिवे, सुनील जावरकर, कमलाकर पिढेकर आदी मान्यवर उपस्थित होते. हा भिडेवाडा चित्ररथ एका ५० फूट लांब कंटेनररुपी मालमोटारीवर साकारण्यात आला आहे. यामध्ये पुण्यातील मुलींची पहिली शाळा, त्या शाळेच्या इमारतीचा बाह्यभाग, पुस्तकांशी मैत्री दर्शवणारे शिल्प आणि महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा यासह अनेक माहितीपूर्ण बाबी दर्शवण्यात आल्या आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर