ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

‘कसं काय?’ आरोग्य गीत ग्रामीण भागात लोकप्रिय:’माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाचा संदेश पोहोचवते

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्य शासनाच्या ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानांतर्गत जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेले ‘कसं काय?’ हे आरोग्य गीत ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये खूप लोकप्रिय झाले आहे. या गीतातील आरोग्यदायी संदेशाचा नागरिकांवर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी मुंबईत या गीताचा शुभारंभ करण्यात आला. अमरावती जिल्ह्यात ठिकठिकाणी ऐकविल्या जाणाऱ्या या गीताच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा संदेश प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचवला जात आहे. जिल्हा परिषदेमार्फत ग्रामस्तरावर विविध आरोग्य जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये गाव स्वच्छता अभियान, आरोग्य तपासणी शिबिरे, माता-बाल आरोग्य मार्गदर्शन, व्यसनमुक्ती जनजागृती, पोषण अभियान, योग व प्राणायाम उपक्रम तसेच आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांमार्फत घरभेटी यांसारख्या कार्यक्रमांना गती देण्यात आली आहे. ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे अभियान केवळ आरोग्य विभागापुरते मर्यादित नसून, प्रत्येक नागरिकाच्या सहभागातून यशस्वी होणारी लोकचळवळ आहे. शाळा, ग्रामपंचायत, महिला बचत गट, युवक मंडळे आणि ग्राम आरोग्य समित्यांच्या सहभागातून हे अभियान लोकचळवळीच्या स्वरूपात राबवले जात आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ सत्यम गांधी यांनी सर्व ग्रामपंचायती, महिला बचत गट, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि युवकांना या अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण परिसे यांनी सांगितले की, ‘कसं काय?’ हे आरोग्यगीत नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणारे प्रभावी माध्यम ठरत आहे. नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार, स्वच्छता, लसीकरण आणि व्यसनमुक्त जीवनशैली यांसारखे महत्त्वाचे संदेश या गीतातून सहजपणे लोकांपर्यंत पोहोचत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर