ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

दारव्ह्यात पेट्रोल- डिझेलसाठी एकाच पंपावर वाहनांच्या रांगा:भर उन्हात वाहनचालकांची इंधन मिळवण्यासाठी धडपड‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शहरातील बहुतांश पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा खंडित झाल्याने मंगळवारी 2 जून रोजी कारंजा रोडवरील लाठीवाला भारत पेट्रोलियम पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी वाहनांची प्रचंड गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. दुपारी दोन वाजताच्या भर उन्हात शेकडो दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर तसेच इतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शहरातील इतर पेट्रोल पंपांवर इंधन उपलब्ध नसल्याने वाहनचालकांनी लाठीवाला पेट्रोल पंपाकडे धाव घेतली. परिणामी पंप परिसरासह मुख्य रस्त्यावरही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक वाहनचालकांना इंधन भरण्यासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागली. यामुळे भर उन्हात उभे राहून इंधनासाठी वाट पाहणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्याने काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे दिसून आले. शहरात इंधनाचा पुरवठा केव्हा सुरळीत होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. पेट्रोल पंपावर इंधनाचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पंपचालकांना मोठ्या आर्थिक गुंतवणुकीचा सामना करावा लागतो. पेट्रोल किंवा डिझेलचा नवीन टँकर मागविण्यापूर्वी साधारणतः २० लाख रुपयांपर्यंतची रक्कम कंपनीकडे आगाऊ जमा ठेवावी लागते. त्यानंतर स्वतंत्र वाहतूक खर्च करून टँकर पंपापर्यंत आणावा लागतो. म्हणजे एका टँकरचे पैसे कंपनीकडे आधीच जमा असताना दुसऱ्या टँकरसाठी पुन्हा भांडवल उभे करावे लागते. मागणी वाढल्याच्या काळात हे आर्थिक चक्र अधिक आव्हानात्मक ठरते. मोठी रक्कम सतत गुंतलेली राहणे, बँक व्यवहार, ऑनलाइन प्रक्रियेतील अडचणी आणि पुरवठ्यातील विलंब यांचा थेट परिणाम इंधन उपलब्धतेवर होतो. त्यामुळे काही वेळा पंपांवर तात्पुरती टंचाई निर्माण होऊन उपलब्ध इंधन असलेल्या पंपांवर वाहनधारकांची गर्दी वाढते. इंधन साठवणुकीचा निर्णय घेऊ नका ^शहरात एखाद्या ठिकाणी इंधनाचा तात्पुरता तुटवडा निर्माण झाला की, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होते. अशा परिस्थितीत अनेक वाहनधारक गरजेपेक्षा जास्त पेट्रोल किंवा डिझेल भरण्याचा प्रयत्न करतात. उपलब्ध साठ्यावर अतिरिक्त ताण येऊन गर्दी वाढते. अफवांवर विश्वास ठेवू नये. -तुषार राठोड, पुरवठा निरीक्षक दारव्हा.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर