ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

धन्वंतरी रुग्णालयात 40 वर्षांनी पहिल्यांदाच निवडणूक:15 जागांचे निकाल जाहीर, 6 उमेदवार बिनविरोध विजयी

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


गेल्या ४० वर्षांत पहिल्यांदाच अमरावती येथील धन्वंतरी सहकारी रुग्णालय सहकारी संस्थेची (दसरा मैदानजवळ, बडनेरा रोड) निवडणूक पार पडली. सोमवारी दुपारी या निवडणुकीचा निकाल घोषित करण्यात आला. १७ मे रोजी झालेल्या मतदानात ३ हजार १७१ मतदारांपैकी १ हजार ३३८ (४२.१९ टक्के) मतदारांनी आपला हक्क बजावला होता. कॅम्प परिसरातील आशीर्वाद मंगल कार्यालयात सोमवारी सकाळी ९ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सुमारे तीन तासांत सर्व निकाल जाहीर झाले. धन्वंतरी सहकारी रुग्णालय सहकारी संस्थेचे संचालक मंडळ २१ सदस्यीय आहे. यात सर्वसाधारण मतदारसंघातून १३, सहकारी संस्था मतदारसंघातून ३, महिलांसाठी राखीव २, तर एससी-एसटी, ओबीसी आणि विमुक्त व भटक्या जमाती (व्हीजे-एनटी) मतदारसंघातून प्रत्येकी एका प्रतिनिधीची निवड करण्यात आली. विजयी उमेदवारांमध्ये सर्वसाधारण मतदारसंघातून डॉ. प्रमोद झाडे (७३२ मते), अजय दातेराव (७१३), अशोक ठाकरे (६७५), ओंकारराव बंड (६५२), प्रतापराव भुयार (६४७), राजेश गोयनका (६४१) आणि गजाननराव रडके (६२६) यांचा समावेश आहे. सहकारी संस्था मतदारसंघातून प्राचार्य प्रकाश काळबांडे (१४७), मनीष कोरपे (१६१) आणि संजय वानखडे-मार्डीकर (१४९) विजयी झाले. ओबीसी मतदारसंघातून अमित गावंडे (७८७), एससी-एसटी मतदारसंघातून प्राचार्य डॉ. संजय खडसे (७५१) आणि विमुक्त व भटक्या जमाती मतदारसंघातून अरुण बांबल (८४२) यांनी विजय मिळवला. महिलांसाठी राखीव मतदारसंघातून मिनल देशमुख (८०६) आणि वंदना वानखडे (७३१) विजयी झाल्या. सहायक जिल्हा उपनिबंधक सुधीर खंबायत यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले, त्यांना सहकार विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. दरम्यान, या निवडणुकीत सहा जागांसाठी जुनेच सूत्र कायम राहिले. नेहमीप्रमाणे ही निवडणूक अविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न झाले होते, परंतु ते पूर्णतः यशस्वी झाले नाहीत. केवळ सर्वसाधारण मतदारसंघातील वैद्यकीय सक्षम उमेदवारांपुरतेच हे प्रयत्न मर्यादित राहिले. त्यामुळे डॉक्टरांचा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सहा जागांसाठी एकेकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने मनोज गुप्ता, ओ. जी. मुंधडा, अनिल रोहणकर, अविनाश लव्हाळे, स्वप्नील शिरभाते आणि आशिष साबू हे सहा वैद्यकीय व्यावसायिक अविरोध विजयी झाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर