ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

पर्यावरण रक्षणासाठी पुसदमध्ये सायकल व ई-बाईक प्रभात फेरी:सामाजिक संघटनांचा उपक्रम; जनजागृतीला नागरिकांचा प्रतिसाद‎

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुसद शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण जनजागृतीसाठी सायकल व ई-बाईक प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धन, प्लास्टिकमुक्ती आणि जलसंधारणाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गीताई केंद्र येथे सकाळी कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांचा विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्ष भेट देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच पाणी साठवणुकीच्या बाबतीत पुसद तालुका मागे असल्याची खंत व्यक्त करत जलसंधारणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित केली. यानंतर प्रभात फेरीला प्रारंभ झाला. गीताई केंद्र येथून निघालेली फेरी छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, कापड लाईन, महात्मा गांधी चौक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे स्व. वसंतराव नाईक चौक येथे पोहोचली. या ठिकाणी डॉ. संजय अग्रवाल यांनी प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती दिली. वाढते तापमान, बिघडलेले ऋतुचक्र आणि पाण्याचे संकट या पार्श्वभूमीवर, जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पुसद शहरात पर्यावरणाचा जागर करण्यात आला. शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण जनजागृतीसाठी एक भव्य सायकल आणि ई-बाईक प्रभात फेरी आयोजित करण्यात आली होती. पर्यावरण संवर्धन, प्लास्टिकमुक्ती आणि जलसंधारणाचा प्रभावी संदेश देणाऱ्या या उपक्रमाला पुसदकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ११ हजारांची देणगी यावेळी निसर्ग संवादच्या वतीने गजानन वायकुळे आणि राजीव कांडलकर यांनी मिशन ग्रीन संस्थेच्या पर्यावरण संवर्धन कार्यासाठी ११ हजार रुपयांचा धनादेश प्रदान केला. कार्यक्रमाच्या शेवटी माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनतर्फे सहभागींसाठी फराळाची व्यवस्था करण्यात आली. या उपक्रमात मिशन ग्रीन बहुउद्देशीय संस्था, माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन, वसुंधरा बहुउद्देशीय संस्था, रुग्णमित्र फाउंडेशन, ज्ञानदीप अकॅडमी, नाम फाउंडेशन, रोटरी क्लब, लॉयन्स क्लब, डॉक्टर असोसिएशन, वंदे मातरम सायकल ग्रुप, पतंजली योग समिती, निसर्ग संवाद, पुस सेवा फाउंडेशन आणि गीताई केंद्र यांसह अनेक सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर