ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

पाणंद रस्त्यांवर होणार 1502 कोटींचा खर्च‎:मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना, 11540 किलोमीटर लांबीचे रस्ते होणार‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजने अंतर्गत जिल्ह्यातील सातही विधानसभा क्षेत्रांमध्ये एकूण ६ हजार ८३६ शेत पाणंद रस्ते निश्चित करण्यात आले आहे. या रस्त्यांची एकुण लांबी सुमारे ११ हजार ५४० किलोमीटर असून त्यासाठी अंदाजे १५०२ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी लागणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दै. दिव्य मराठीशी बोलताना दिली. पाच वर्षात टप्प्याटप्प्याने व जलद गतीने पूर्ण करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी राज्य शासन, जिल्हा नियोजन, खनिज प्रतिष्ठानकडून निधी उपलब्ध केला जाणार असून त्यामाध्यमातून शेत पाणंद रस्त्यांची कामे केली जाणार आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कार्यकारी समिती तसेच विधानसभा क्षेत्रस्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. यवतमाळ विधानसभा क्षेत्रात १७५३ किमी लांबीचे १ हजार ११३ रस्ते असून, त्यासाठी अंदाजित रक्कम २६२.९५ कोटी रुपये, राळेगाव विधानसभा क्षेत्रात राळेगाव, कळंब व बाभुळगाव तालुक्यात १८५० किमी लांबीचे १०९९ रस्त्यांसाठी अंदाजित रक्कम २४८.७० कोटी रुपये, आर्णी विधानसभा क्षेत्रातील आर्णी, केळापूर व घाटंजी तालुक्यातील १५८० किमी लांबीचे ६७२ रस्त्यांसाठी अंदाजित रक्कम २२१.२० कोटी रुपये, वणी विधानसभा क्षेत्रातील वणी व मारेगाव, झरीजामणी तालुक्यातील २२९७ किमी लांबीचे १६६२ रस्त्यांसाठी अंदाजित रक्कम ३४२.६६ कोटी रुपये. दिग्रसमध्ये विधानसभा क्षेत्रातील दिग्रस, दारव्हा व नेर तालुक्यातील २३४४ किमी लांबीचे ११६२ रस्त्यांसाठी अंदाजित रक्कम २८९.३७ कोटी रुपये तसेच पुसद, उमरखेड, महागांव साठी निधी निश्तिच केला आहे. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेसाठी विविध यंत्रसामुग्री व पाईप पुरवठ्याकरिता निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. जिल्हास्तरीय कार्यकारी समितीमार्फत विधानसभा मतदारसंघनिहाय त्याचे दर निश्चित करण्यात आले असून, ५३ निविदाधारकांपैकी ५२ निविदाधारकांनी कमी दराने काम करण्यास सहमती दर्शविली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर