ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

नांदगाव खंडेश्वर तालुक्यात दोन वर्षांपासून शेतात वीज खांब पडलेले:महावितरणच्या दुर्लक्षामुळे शेतीकामात अडथळा, अपघाताची भीती

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील रोहना गावात शेतकरी प्रशांत शामराव वानखडे यांच्या शेतात गेल्या दोन वर्षांपासून वीजेचे खांब जमिनीवर पडले आहेत. महावितरणच्या दुर्लक्षामुळे शेतीकामात अडथळा येत असून, अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. वानखडे यांनी यासंदर्भात महावितरण कार्यालयाकडे अनेक वेळा अर्ज आणि दूरध्वनीद्वारे संपर्क साधला आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असा त्यांचा अनुभव आहे. जमिनीवर पडलेल्या या खांबांमुळे शेतात आंतरमशागत, पेरणी आणि इतर शेतीकामे करणे अडचणीचे झाले आहे. या पडलेल्या खांबांमुळे भविष्यात अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यताही वानखडे यांनी व्यक्त केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ याकडे लक्ष देऊन पडलेले वीज खांब उभे करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. जर काही अनुचित घटना घडल्यास, त्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण प्रशासनाची असेल, असा इशाराही अर्जदाराने दिला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर