ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

जिल्हाधिकाऱ्यांच्या धाडीत लाखोंचा वाळूसाठा जप्त

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बाभुळगाव तालुक्यात सुरू असलेल्या मोठ्या रेतीचोरीच्या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी विकास मिना यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने अचानक आढावा दौरा आणि बेंबला धरणाची पाहणी केली. कोणालाही सुगावा लागू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी थेट दुचाकीवरून जात तांभा वाळूघाटावर धडक धाड टाकली. या अचानक झालेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. या मोहिमेदरम्यान महसूल विभागाने १५० ते २०० ब्रास वाळू साठा जप्त केला, तसेच रस्त्यावर अवैधरीत्या रेती वाहतूक करणाऱ्या एका ट्रकवरही कारवाई केली. बाभुळगाव तालुका गेल्या काही वर्षांत वाळू तस्करीचे मुख्य केंद्र बनला असून, अधिकृत लिलाव झाल्यासारखी तस्कर येथे दिवसाढवळ्या हजारो ट्रक रेती चोरून नेत आहेत. विशेषतः या वर्षी एका गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या तस्कराने तांभा वाळूघाटावर चक्क ट्रक आणि ट्रॅक्टरचा दरबार भरवला होता. तिथे पोकलँड, ट्रेझर बोट आणि मोटारबोट सारख्या अतिआधुनिक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने हजारो ट्रक रेतीची चोरी केली जात असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नव्हती. यापूर्वी ५ जून रोजी झालेल्या कारवाईसह गेल्या दोन वर्षांत महसूल विभागाने बाभुळगावात अनेकदा रेती जप्त केल्याच्या नोंदी आहेत. मात्र, प्रशासन रेती जप्त करते आणि रात्रीतून तस्कर ती वाहून नेतात, असा येथील जुनाच पॅटर्न राहिला आहे. जप्त केलेल्या रेतीचा पुढे कोणताही ठोस मागोवा घेतला जात नसल्याने ही २०० ब्रास रेती तरी सुरक्षित राहील का, असा खोचक सवाल जनता विचारत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते ही कारवाई केवळ दिखाऊ असून प्रश्नांचा मूळ पाया अद्यापही पोकळ आहे. जप्त रेती रात्रीतून गायब, जुनाच पॅटर्न पुन्हा गेल्या दोन वर्षांत महसूल विभागाने बाभुळगावात अनेकदा रेती जप्त केल्याच्या नोंदी आहेत. परंतु, प्रशासन रेती जप्त करते आणि रात्रीतून तस्कर ती वाहून नेतात,” हा येथील नेहमीचाच प्रकार बनला आहे. जप्त केलेली रेती पुढे कुठे गेली? तिचा लिलाव का झाला नाही? याचा कोणताही ठोस मागोवा प्रशासनाने आजवर घेतलेला नाही. त्यामुळे ५ जून रोजी जप्त केलेली ही २०० ब्रास रेती तरी सुरक्षित राहील का? असा खोचक सवाल जनता विचारत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर