ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

श्रमदानामधून लोणी येथील पडकी इमारतीत साकारले अभ्यासिका केंद्र:स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी गावातच सुरू झाला आदर्शवत उपक्रम‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


तालुक्यातील लोणी येथील स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुसद शहरात जावे लागत होते. अंतराची मर्यादा होती. तसेच मुलींना दिवसभर दूरवर अभ्यासिकेसाठी पाठवणे घरच्यांना असुरक्षित वाटत होते. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गावातच वाचनालय व अभ्यासिका केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी जागेची अडचण निर्माण झाली होती. त्यावेळी गावातील अनेक वर्षांपासून अडगळीत पडलेली जुनी इमारत या कामासाठी वापरता येईल, असा सर्वानुमते निर्णय झाला. सरपंच व ग्रामसेवकांनी परवानगी दिल्यानंतर गावातील तरुणांनी एकत्र येत दिवसरात्र मेहनत करून इमारतीतील सर्व खोल्या स्वच्छ केल्या. लोणी गावातील या पडक्या इमारतीची स्वखर्चाने रंगरंगोटी करण्यात आली. तसेच लाईट फिटिंगचे काम पूर्ण करण्यात आले आहे. सध्या फर्निचर बांधणीचे काम सुरू आहे. येथील विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधांचा लाभ मिळावा यासाठी इंटरनेट सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मोबाइलवर तासन्‌तास वेळ घालवणारी तरुणाई विधायक कामासाठी पुढे सरसावल्याचे पाहून गावातील वडीलधारी नागरिकही भारावून गेले. त्यांनीही श्रमदान करत या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला. कारागिर चिरमाडे, वायरमन बोडखे यांची मदत या कार्यात बांधकाम कारागीर समाधान चिरमाडे यांनी निःशुल्क पिलर बांधून दिला. वायरमन अविनाश बोडखे यांनी निःशुल्क वीज जोडणी करून दिली. तसेच गावातील संजय कांबळे (वेल्डर) यांनी निःशुल्क वेल्डिंगचे काम करून सहकार्य केले. याशिवाय इतरही अनेक ग्रामस्थ मदतीसाठी पुढे येत आहेत. गावातील तरुणांच्या श्रमदानातून उभा राहत असलेला हा अभ्यासिका केंद्राचा उपक्रम लोणीसाठी प्रेरणादायी ठरत आहे. या कामाची गावभर चर्चा सुरू आहे. हा उपक्रम सामाजिक एकोप्याचे आणि सामूहिक प्रयत्नांचे उत्तम उदाहरण ठरत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर