ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

पुसद येथे एकाच वेळी सहा अवैध सावकारांवर कारवाई:सहकार विभागाच्या सहा पथकांचे छापे, आक्षेपार्ह्य दस्तऐवज जप्त‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अवैध सावकारी संदर्भात प्राप्त तक्रारीवरुन सावकार विरोधी पथकाने शहरात एकाच वेळी सहा पथके तयार करुन अवैध सावकारी करणाऱ्या सहा ठिकाणांवर छापे मारले. शहरातील विविध भागांत मंगळवारी २६ मे रोजी एकाच दिवशी ही कारवाई केली. या कारवाईंत ९८ आक्षेपार्ह्य दस्तऐवज जप्त केल्याची माहिती आहे. या कारवाईत सावकाराचे सहाय्यक निबंधक, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे शिल्पा सुरोशे रा. हनुमान वॉर्ड यांच्या प्राप्त तक्रारीवरुन यशवंत बाबुराव पल्लेवार रा. उदासी वॉर्ड, यांच्या घरी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ नुसार अधिकाराचा वापर करुन झडती कार्यवाही केली. यात आक्षेपार्ह १८ कागदपत्रे, दस्तऐवज, कोरे धनादेश व इतर कागदपत्रे जप्त केले. भालचंद्र धुमाळ रा. धनकेश्वर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सुनिल राजेश्वर कोमरवल्लीवार, उर्वरित. पान ४ कारवाईत या पथकाचा समावेश या कारवाई जिल्हा सनियंत्रण समिती अध्यक्ष जिल्हाधिकारी विकास मिना, सदस्य जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, सचिव जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नानासाहेब चव्हाण, तहसीलदार पुसद यांच्या मार्गदर्शनात व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पुसद के. एस. मस्के यांच्या नियोजनात एकूण ६ सावकारी पथकाद्वारे ही कारवाई केली. त्यात कैलाश खटटारे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था घाटंजी, व्ही. के. हिरुडकर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दारव्हा. ए. के. सुरपाम सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दिग्रस, अनिल नाईक सहाय्यक निबंधक सहकारी संस्था राळेगाव, प्रकाश झळके सहकार अधिकारी श्रेणी-१ यांनी पथकाचे प्रतिनिधीत्व केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर