ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

अकरावी तिसऱ्या फेरी प्रवेशाचा आज शेवटचा दिवस:जिल्ह्यात 31,367 जागा अजूनही रिक्त

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीतील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी आज, २५ जून हा शेवटचा दिवस आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येणार आहे. जिल्ह्यात अद्यापही ३१,३६७ जागा रिक्त असून, एकूण ४३,११० प्रवेश क्षमतेपैकी २० जूनपर्यंत केवळ ११,७४३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. तिसऱ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांनी २० जूनपर्यंत ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांना महाविद्यालये अलॉट करण्यात आली. या विद्यार्थ्यांना आज सायंकाळपर्यंत प्रवेश घेण्याची मुदत आहे. तिसऱ्या फेरीचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर, २७ जूनपासून चौथ्या फेरीची प्रक्रिया सुरू केली जाईल. यावर्षी अकरावीचे सर्व प्रवेश केंद्रीय पद्धतीने केले जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना थेट महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेता येत नाही. ऑनलाइन अर्ज दाखल केल्यानंतर संबंधित यंत्रणेने अलॉट केलेल्या महाविद्यालयातच प्रवेश घेणे बंधनकारक आहे. शिक्षण संचालनालयाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात विज्ञान शाखेच्या सर्वाधिक १८,५७० जागा आहेत, तर कला शाखेच्या १८,३०० आणि वाणिज्य शाखेच्या ६,२४० जागा आहेत. २० जूनपर्यंतच्या पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये विज्ञान शाखेत ७,११९, कला शाखेत ३,८०५ आणि वाणिज्य शाखेत केवळ ८१९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. या आकडेवारीनुसार, विज्ञान शाखेत ११,४५१, कला शाखेत १४,४९५ आणि वाणिज्य शाखेत ५,४२१ जागा रिक्त आहेत. एकूण ३१,३६७ जागा अद्याप रिकाम्या आहेत. तिसऱ्या फेरीचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर, शनिवार, २७ जूनपासून चौथ्या फेरीचा प्रारंभ होईल.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर