ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

डॉ. प्रमोद पोतदार यांचा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सत्कार:मोर्शी, वरुड रुग्णालयातील अतुलनीय कामगिरीबद्दल गौरव

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालय आणि वरुड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार यांचा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शस्त्रक्रिया आणि रक्तदानाच्या क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल तसेच दोन्ही रुग्णालयांच्या कायापालटासाठी त्यांना गौरविण्यात आले. हा सत्कार श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी खासदार अमर काळे, खासदार बळवंतराव वानखडे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, मोर्शीच्या नगराध्यक्षा प्रतीक्षाताई गुल्हाने, उपाध्यक्ष डॉ. प्रदीप कुऱ्हाडे, डॉ. प्रवीण चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी डॉ. पोतदार यांना दोन चषक, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. डॉ. पोतदार यांच्या कार्यकाळात मोर्शीच्या उपजिल्हा रुग्णालयाने अनेक महत्त्वपूर्ण पुरस्कार पटकावले आहेत. यामध्ये राज्यस्तरीय एकत्रित महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या हस्ते मिळालेला पुरस्कार तसेच राष्ट्रीय कायाकल्प योजनेद्वारे राज्यातून प्राप्त झालेला दहा लाखांचा द्वितीय पुरस्कार यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, वरुड येथील ग्रामीण रुग्णालयालाही अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार, डॉ. आनंदीबाई गौरव पुरस्कार आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमात जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार यांचा समावेश आहे. डॉ. प्रमोद पोतदार यांनी तीन वर्षांच्या कार्यकाळात मोर्शी आणि वरुड येथे महिलांच्या मोफत गर्भपिशवी शस्त्रक्रिया, सामान्य शस्त्रक्रिया, सिझेरियन शस्त्रक्रिया आणि अनेक लघु शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या. त्यांनी पल्स पोलिओ मोहीमही उत्कृष्टरित्या राबवली. विशेष म्हणजे, डॉ. पोतदार यांनी मोर्शी व वरुड येथे रक्तदाता संघाची स्थापना करून हजारो बॉटल रक्त संकलित करण्याचा विक्रमही केला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर