ब्रेकिंग न्यूज
⚡ औंढा नागनाथ मंदिर एक महिना बंद राहणार, भाविकांना 5 ऑक्टोबरपासून दर्शन नाही, कारण… ✦ ⚡ स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ✦ ⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन…
SP News Maregaon

घोषणांचा सुकाळ, कामांचा दुष्काळ:शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंचा छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर घणाघात

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या कारभारावर टीका केली आहे. महापालिकेच्या 100 दिवसांच्या कामकाजावर बोलताना दानवे यांनी ‘घोषणांचा सुकाळ आणि कामांचा दुष्काळ यापलीकडे शहराच्या पदरात काहीच पडलेले नाही’, अशा शब्दात प्रहार केला आहे. तसेच मनपा गटनेते गणेश लोखंडे यांनीही कामकाजावर ताशेरे ओढले आहेत. सत्ताधाऱ्यांच्या अपयशाची आणि खोटेपणाची ही तिखट उदाहरणे, असे म्हणत अंबादास दानवे यांनी काही मुद्यांवर लक्ष वेधले आहे. हेरिटेज वॉकचा सपशेल खोटा दावा: महापालिकेने स्वतः ‘हेरिटेज वॉक’ सुरू केल्याचे सांगतात. मात्र हे वॉक सुमारे दहा वर्षांपासून शहरात सुरू आहेत. महापालिका त्यात जाऊन बसली एवढंच. पाणीप्रश्न अधिक बिकट, नागरिक टँकरच्या विळख्यात अंबादास दानवे म्हणाले, पाणीपुरवठ्याचा गॅप कमी करण्याचे आश्वासन हवेतच विरले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कडक निर्देशानंतरही नागरिकांना हक्काचे पाणी मिळेना. 5-6 दिवसांऐवजी आता थेट महिन्यातून अवघे 3 (120 मिनिटे सारासरी) वेळा पाणी मिळत असल्याने संपूर्ण शहर पाण्यासाठी वणवण भटकत आहे, असे अंबादास दानवे म्हणाले. आरोग्याशी क्रूर खेळ आरोग्याविषयी बोलताना अंबादास दानवे म्हणाले, पडेगाव कचरा डेपोला लागलेली आग आणि धुराच्या विळख्यामुळे परिसरातील नागरिकांचे, लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लोकांना आपली घरे विकण्याची वेळ आली आहे, मात्र महापालिका प्रशासन आणि निष्क्रीय महापौर सुस्त बसून आहेत. मान्सूनपूर्व कामांचे वाटोळे अंबादास दानवे म्हणाले, पावसाळा दारावर आलेला असतानाही शहरातील नालेसफाईची कामे रखडलेलीच आहेत. आगामी पावसाळ्यात शहरात पाणी साचून नागरिकांचे अतोनात हाल होणार, हे आता स्पष्ट दिसत आहे. सामान्यांचे मरण, पदाधिकाऱ्यांची चंगळ सर्वसामान्य छोटे व्यापारी आणि शेतकऱ्यांचे पारंपरिक रविवार, शुक्रवार आणि पीर बाजार बंद करण्याचा निर्णय केवळ बिल्डरांचा फायदा करून देण्यासाठी घेण्यात आला आहे. एकीकडे मनपा १२०० कोटी रुपयांच्या कर्जात बुडालेली असताना, दुसरीकडे पदाधिकाऱ्यांच्या चैनीसाठी आलिशान ई-कार खरेदीचा घाट घातला जात आहे. जनतेच्या पैशांची ही निव्वळ उधळपट्टी असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली आहे. ​केवळ ‘सिटी ट्रान्सफॉर्मेशन’ आणि ‘2047 चे व्हिजन’ अशा कागदी आणि चकचकीत घोषणा करून शहराचे मूलभूत प्रश्न सुटणार नाहीत. भाजपचा हा 100 दिवसांचा कार्यकाळ शहराला प्रगतीऐवजी अधोगतीकडे घेऊन जाणारा आणि पूर्णपणे अपयशी ठरलेला असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर