ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

मॉर्निंग वॉकदरम्यान चिमुरडीवर बिबट्याची झडप:आरडाओरड ऐकताच नागरिक धावले, चिमुरडीचा जीव थोडक्यात बचावला

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. ओतूर परिसरातील वाकचौरे मळा येथे गुरुवारी पहाटे 10 वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. काव्या महेंद्र वाकचौरे असे जखमी मुलीचे नाव असून या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सुमारे 6 वाजण्याच्या दरम्यान काव्या आपल्या बहिणीसोबत घराजवळ मॉर्निंग वॉक करत होती. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक तिच्यावर झडप घातली. बिबट्याने हल्ला करताच काव्याने मोठ्याने आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिक तातडीने घटनास्थळी धावून आले. नागरिकांचा गोंधळ आणि ओरड सुरू झाल्यानंतर बिबट्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला. या हल्ल्यात काव्याच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या असून तिला तातडीने ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. ओतूर येथे 14 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले ग्रामीण रुग्णालय अद्याप सुरू झाले नसल्याने जखमी मुलीच्या उपचारासाठी मोठी गैरसोय झाल्याचा आरोप नागरिकांनी केला. रुग्णालयात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती नसल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सामाजिक कार्यकर्ते अशोक सखाराम अहिनवे आणि मुलीच्या पालकांनी घटनेची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाकचौरे मळा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून लहान मुलांना घराबाहेर पाठवण्यासही पालक घाबरत आहेत. वनविभागाने तातडीने परिसरात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या घटनेनंतर जुन्नर परिसरातील वनविभागाच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर