ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

देशातील पहिल्या अंडरवॉटर म्युझियमचा श्रीगणेशा:नौदलाची ऐतिहासिक युद्धनौका ‘आयएनएस गुलदार’ सिंधुदुर्गच्या समुद्रतळाशी विसावली

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भारतीय नौदलात तब्बल ३६ वर्षे शत्रूंना धडकी भरवणारी ‘आयएनएस गुलदार’ ही ऐतिहासिक युद्धनौका आता एका नव्या आणि अनोख्या भूमिकेत दिसणार आहे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर निवती रॉक्सजवळ ही नौका समुद्रतळाशी २२ मीटर खोलीवर कायमची विसावली आहे. यातून देशातील पहिल्या ‘अंडरवॉटर म्युझियम’ आणि ‘सबमरीन टुरिझम’ची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. केवळ युद्धाचा इतिहास जपणारी ही नौका आता समुद्रात कृत्रिम प्रवाळ (कोरल) तयार करून दुर्मिळ सागरी जीवांचे नवे घर बनणार आहे, हा या प्रकल्पातील सर्वात नावीन्यपूर्ण भाग आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे राज्याच्या आणि विशेषतः कोकणच्या पर्यटनाला जागतिक पातळीवर एक नवी ओळख मिळाली आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून विजयदुर्ग बंदरामध्ये या जहाजावर तांत्रिक प्रक्रिया सुरू होती. ती पूर्ण झाल्यानंतर या नौकेने निवतीच्या दिशेने आपला शेवटचा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला. या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर स्कुबा डायव्हिंग, बोटिंग आणि आदरातिथ्य क्षेत्रात रोजगाराच्या अभूतपूर्व संधी निर्माण होणार आहेत. परिणामी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. समुद्रात कोणतीही मोठी वस्तू टाकताना पर्यावरणाची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. याच पार्श्वभूमीवर, गोवा येथील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी’ने (एनआयओ) निवती रॉक्स परिसराचा सखोल वैज्ञानिक अभ्यास केला. समुद्रात नौका सोडण्यापूर्वी जहाजातील सर्व धोकादायक रसायने आणि प्रदूषण करणारे घटक पूर्णपणे काढून टाकण्यात आले आहेत. सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोमसे यांनी तारकर्ली येथील ‘एमटीडीसी’च्या स्कुबा डायव्हिंग केंद्रात या प्रकल्पाची अधिकृत घोषणा केली. सागरी पर्यटन, साहसी खेळ आणि पर्यावरण संवर्धन यांचा हा एक उत्तम संगम असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. याआधी अमेरिकेत असा प्रयोग युद्धनौका किंवा मोठी जहाजे निवृत्त झाल्यानंतर ती समुद्रात बुडवून त्यांचे ‘कृत्रिम प्रवाळ’ बनवण्याची संकल्पना जगात वेगाने लोकप्रिय होत आहे. यामुळे समुद्रातील माशांना सुरक्षित अधिवास मिळतो. अमेरिकेतील ‘युएसएस ओरिस्कनी’ हे महाकाय विमानवाहू जहाज अशाच प्रकारे बुडवून जगातील सर्वात मोठे कृत्रिम प्रवाळ बनवण्यात आले होते. आता भारतातही हा अनोखा व पर्यावरणपूरक प्रयोग होत आहे. कोकणातील या अनोख्या प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये आणि सुरक्षा नियम कृत्रिम प्रवाळ आणि जैवविविधता: समुद्रतळाशी नौकेभोवती कृत्रिम प्रवाळ विकसित होतील. त्यामुळे दुर्मिळ मासे आणि इतर सागरी जीवांना हक्काचा निवारा मिळेल. ५०० मीटर परिसरात बंदी: सुरक्षेच्या कारणास्तव नौकेच्या ठिकाणाहून ५०० मीटर परिसरात मासेमारी आणि इतर व्यावसायिक जहाजांना नांगर टाकण्यास मनाई. पर्यटकांसाठी पाणबुडी: पर्यटकांना या युद्धनौकेचे पाण्याखालून दर्शन घेण्यासाठी एका विशेष पाणबुडीची निर्मिती सुरू आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर