ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

गिरिप्रेमीची एव्हरेस्ट मोहीम यशस्वी:तीन गिर्यारोहकांनी शिखर सर केले, डेथ झोन’मधील 10 तासांच्या थरारक संघर्षानंतर शिखर सर

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


गिरिप्रेमीच्या एव्हरेस्ट मोहिमेने 21 मे रोजी पहाटे जगातील सर्वोच्च माऊंट एव्हरेस्ट (8,848.86 मीटर) शिखरावर यशस्वी चढाई केली. नेपाळमधील पारंपरिक साऊथ कोल मार्गाने ही मोहीम पूर्ण झाली. 2012 आणि 2013 नंतर गिरिप्रेमीची ही तिसरी यशस्वी एव्हरेस्ट मोहीम ठरली आहे. ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखालील या मोहिमेत विवेक शिवदे, मिहिर जाधव आणि अखिल काटकर यांनी शिखर सर केले. त्यांच्यासोबत लाक्पा शेर्पा, उर्गेन शेर्पा आणि लाक्पा तेनजी शेर्पा हे शेर्पा गिर्यारोहकही होते. 2 एप्रिल 2026 रोजी पुण्यातून निघालेल्या या पथकाने जवळपास आठ आठवडे एव्हरेस्ट परिसरात राहून वातावरणाशी जुळवून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. यात लोबुचे ईस्ट शिखर चढाई आणि एव्हरेस्टवरील कॅम्प 2 पर्यंतच्या फेऱ्यांचा समावेश होता. अंतिम शिखर चढाई मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर पथकाने उच्च कॅम्पमार्गे शिखराकडे कूच केली. यंदा हवामान अनुकूल असले तरी, गिर्यारोहकांना ‘डेथ झोन’मध्ये (8000 मीटरवरील कमी प्राणवायू असलेले क्षेत्र) सलग 10 तासांहून अधिक काळ चढाई करावी लागली. आरोग्याच्या कारणांमुळे संघातील सदस्य निकुंज शहा यांनी कॅम्प 4 च्या खालील भागातून परतण्याचा निर्णय घेतला. एव्हरेस्ट बेस कॅम्पवरून मोहिमेचे समन्वय करणारे नेते उमेश झिरपे म्हणाले, ‘यंदा एव्हरेस्टवरील हवामानाची संधी खूपच कमी होती. जेट स्ट्रीम्समुळे शिखर चढाईसाठी मर्यादित वेळ होता. अशा परिस्थितीत योग्य वेळ साधत सुरक्षितरीत्या शिखर चढाई पूर्ण करणे हे मोठे आव्हान होते, जे संघाने यशस्वीपणे पार केले. हवामानाची साथ मिळाली, पण या यशामागे संघाची शिस्त, संयम, मानसिक ताकद आणि टीमवर्क अधिक महत्त्वाचे ठरले.’

या यशस्वी मोहिमेसह उमेश झिरपे यांनी आता एकूण 18 गिर्यारोहकांना एव्हरेस्ट शिखरावर नेण्याचा मान मिळवला आहे. ही मोहीम भारत सरकारच्या ‘फिट इंडिया’ अभियानाला पाठिंबा देणारी असून शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक सक्षमता आणि सक्रिय जीवनशैलीचा संदेश देणारी ठरली. जबाबदार गिर्यारोहण, हिमनद्या संवर्धन आणि हवामान बदलाबाबत जनजागृती हाही मोहिमेचा महत्त्वाचा उद्देश होता. या मोहिमेच्या यशस्वी नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये नेपाळस्थित पीक प्रमोशन एजन्सीचेही महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. त्यांनी आवश्यक समन्वय आणि लॉजिस्टिक सहाय्य प्रभावीपणे पुरवले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर