ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

तंबाखू, गुटखा खाणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही:कर्तव्यावर असताना तंबाखू, गुटखा सेवन करणाऱ्या १३ शासकीय कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हिंगोली जिल्हा परिषदेच्या विविध कार्यालयांमधून कर्मचाऱ्यांची तपासणी केल्यानंतर १३ जणांकडे गुटखा व तंबाखुच्या पुड्या आढळून आल्या आहेत. तर हे कर्मचारी कार्यालयात काम करीत असताना गुटखाचे सेवन करीत असताना आढळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जिल्हा परिषदेमध्ये खळबळ उडाली आहे. हिंगोली जिल्ह्यात गुटखा बंदी असतांनाही अनेक ठिकाणी गुटखा विक्री होत असल्याने पोलिस विभागाने पानटपऱ्यांची तपासणी करून कारवाई सुरु केली आहे. या कारवाईमुळे चोरून लपून गुटखा विक्री करणाऱ्या पानटपरी चालकांचे धाबे दणाणले आहेत. दररोज तीन ते चार ठिकाणी छापे टाकून गुटखा जप्त होत आहे. दरम्यान, गुटखा खाऊन शासकिय कार्यालयाचे कोपरे रंगत असल्याचे चित्र दिसू लागले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे यांच्या पुढाकारातून शासकिय कार्यालयातून तपासणी केली जात आहे. त्यानुसार जिल्हा सल्लागार डॉ. किरण लोंढे, कुलदीप केळकर, आनंद साळवे यांच्या पथकाने जिल्हा परिषद कार्यालयात तपासणी करण्यात आली. यावेळी पथकाने जिल्हा परिषद अंतर्गत विविध कार्यालयातून कर्मचाऱ्यांची तपासणी केली. यामध्ये १३ कर्मचारी गुटखा व तंबाखू खात असल्याचे आढळून आले आहे. तसेच त्यांच्याकडे गुटखा व तंबाखूच्या पुड्या देखील आढळून आल्या. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. जिल्हयातील इतर शासकिय कार्यालयामधूनही लवकरच तपासणी मोहिम हाती घेतली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सुत्रांनी सांगितले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर