ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

14 वर्षांच्या मुलीशी लग्न करायचेय, अडचण येणार का?:तरुणाची वकिलालाच विचारणा, लगेच यंत्रणा कामाला, तरुण निघाला मानसिक रुग्ण

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


न्यायालयात नेहमीची लगबग सुरू होती. एक वकील आपली केस संपवून नुकतेच कोर्टरूमच्या बाहेर आले. त्यांच्यासमोर पंचविशीतील एक तरुण उभा होता. तो जवळ आला आणि संकोचत म्हणाला, “सर, मला थोडी कायदेशीर मदत हवी होती. मला एका १४ वर्षांच्या मुलीशी लग्न करायचे आहे… कायद्याने काही अडचण तर येणार नाही ना?’ वकिलांनी विचारले, “अरे पण १४ वर्षांची मुलगी लग्नासाठी तयार कशी झाली?’ त्यावर त्या तरुणाने ‘मी तिला ६० हजार रुपयांत विकत घेतल्याचे उत्तर दिले. अन् येथून सर्व घटनाक्रम सुरू झाला.त्या तरुणाच्या घरात अठराविश्वे दारिद्र्य. वडील एका हॉटेलमध्ये वेटर, तर आई दुसऱ्यांच्या घरी धुणीभांडी करणारी. वेळेशी झुंज आणि थरारक सुटका मुलीला घरी आणण्यापूर्वी काही कायदेशीर अडचण तर येणार नाही ना, याची खात्री करण्यासाठी तो न्यायालयात पोहोचला. एका वकिलाची गाठ पडली. वकिलाने प्रसंग ओळखला. मुलीचा जीव वाचवणे ही पहिली प्राथमिकता होती. त्यांनी तरुणाला विश्वासात घेतले. “तू त्या मुलीला घेऊन ये, आपण ती स्वमर्जीने लग्न करत असल्याचे कायदेशीर शपथपत्र तयार करू,” असे सांगून त्याला तेथेच गुंतवून ठेवले. यानंतर सूत्रे अत्यंत वेगाने हलली. त्या वकिलाने थेट खंडपीठाचे मुख्य सरकारी वकील यांच्याशी संपर्क साधून सर्व हकीकत सांगितली. मुख्य सरकारी वकिलांनी ही बाब न्यायधीशांना सांगितली, त्यांनी पोलिस आयुक्तांना फोन लावला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखेचे अधिकारी तातडीने सक्रिय झाले. तो तरुण शहरातील एका संस्थेतून शिक्षण घेत असल्याची माहिती वकिलाने संवादातून काढली होती. त्याआधारे संस्थेकडून त्याचा पत्ता आणि मोबाइल क्रमांक मिळवण्यात आला. गुन्हे शाखेचे पीआय गजानन कल्याणकर यांच्या पथकाने पथकाने मोबाइल लोकेशन ट्रेस केले आणि अवघ्या ६ तासांत त्या तरुणाचे घर गाठले. त्याच्या पालकांशी संवाद साधला. तो मानसिक रोगी असल्याचे समोर येताच यंत्रणेचा जीव भांड्यात पडला. विशेष म्हणजे या प्रकरणात कोणतीही मुलगी नसल्याचे उघड झाले.” ‘माझे लग्न होईल का?’ चॅटजीपीटीला विचारायचा प्रश्न तो “माझे लग्न होईल का? कधी होईल?” असे प्रश्न तो रात्री-अपरात्री चॅटजीपीटीवर विचारत बसायचा. त्याच्या याच मानसिक आजाराचा आणि हतबलतेचा फायदा काही मित्रांनी घेतला. एका मित्रांनी त्याला गाठले आणि अत्यंत चलाखीने त्याला खोटे सांगितले. “एक मुलगी आहे जिचे कुणीही नाही. तिचे नातेवाईकच तिला द्यायला तयार आहेत. तू पैसे दिले की ती तुझी,” अशी खोटी थाप मारली. सद्सद्विवेकबुद्धी हरवलेल्या आणि मानसोपचारांवर असलेल्या त्या तरुणाने त्यांच्यावर विश्वास ठेवला. एकदा लग्न करून मूल झाले की ती मुलगी आपल्याला कधीच सोडून जाणार नाही, अशी पक्की आणि चुकीची समजूत त्याच्या आजारी मनावर बिंबवण्यात आली होती.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर