ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

नैसर्गिक तलाव अन् जलाशयांचे पुनरुज्जीवन करा:पावसावरील अवलंबित्व कमी करा; आमदार अमित साटमांची BMCकडे मागणी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजप अध्यक्ष तथा आमदार अमित साटम यांनी बृहन्मुंबई महापालिकेने केवळ पावसावर असलेले अवलंबित्व कमी करण्यासाठी शहरातील सर्व नैसर्गिक तलाव आणि जलाशयांचे पुनरुज्जीवन करावे, तसेच त्या ठिकाणी रिव्हर्स ऑस्मोसिस (आरओ) प्रकल्प उभारून उपलब्ध पाण्याचा वापर करावा, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात साटम यांनी आज महापौर रितू तावडे आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र पाठविले आहे. एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनला झालेला विलंब हा शहरातील पाणीटंचाईस कारणीभूत ठरत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पावसावर १०० टक्के अवलंबून राहणे दिवसेंदिवस अधिक धोकादायक ठरत आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पर्यायी जलस्रोतांचा गांभीर्याने विचार करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे साटम यांनी म्हटले आहे. शहरातील सर्व नैसर्गिक तलाव आणि जलाशयांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी महापालिकेने कृती आराखडा तयार करावा, तसेच त्या ठिकाणी आरओ प्रकल्प उभारून पाणी वापरयोग्य बनवावे, अशी मागणीही साटम यांनी केली आहे. यानंतर परिसरातील भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र वितरण यंत्रणा उभारता येईल. भविष्यातील वाढत्या गरजा लक्षात घेऊन क्षारनिर्मूलन (डिसॅलिनेशन) प्रकल्पाची क्षमता १००० एमएलडीपर्यंत वाढविणे आवश्यक आहे. यासाठीचे काम कोणताही विलंब न करता तातडीने सुरू करावे, असेही त्यांनी नमूद केले आहे. हे ही वाचा… महाराष्ट्रात मान्सून सक्रिय!:मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी; विदर्भातील 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन मान्सून अखेर महाराष्ट्रात एकदा सक्रिय झाला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांत मान्सून संपूर्ण राज्य व्यापणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. आज सकाळपासूनच मुंबईच्या माटुंगा, सेनापती बापट मार्ग, वांद्रे आणि वरळी सी-लिंक परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील काही तास मुंबई आणि उपनगरांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून दुपारनंतर पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा…

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर