ब्रेकिंग न्यूज
श्रावणात श्री क्षेत्र पांडवदेवीत भक्तांची अलोट गर्दी भाजपा मारेगाव शहर सरचिटणीसपदी रविंद्र टोंगे पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा; 15 वर्षीय मुलीसोबत घडणार होतं नको तेच, 15 जणांविरुद्ध गुन्हा पहाटे घराबाहेर पडताच तो मागे लागला; कॉलेजच्या वाटेत अडवलं अन् मुंबईत घडला भयंकर प्रकार IND vs SL Test : बॉलिंगने आग ओकणाऱ्या DSP सिराजचा बॅटिंगमध्ये जलवा; गगनचुंबी सिक्स पाहून श्रीलंका आवाक्, पा… पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी
SP News Maregaon

कोर्टीत रास्ता रोको करताच वीजपुरवठा सुरळीत:आंदोलन दडपण्याचा प्रयत्न फसला; तातडीने सिंगल फेज सुरू

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कोर्टी (ता. पंढरपूर) परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून सिंगल फेज वीज मिळत नाही. थ्रीफेज विजही रोटेशन पद्धतीने दिवसा न मिळता फक्त रात्रीचाच वेळ दिल्याने शेतकरी, नागरिक, विद्यार्थ्यांचे हाल होत होते. याबाबत वेळोवेळी मागणी करूनही वीज वितरणकडून प्रतिसाद मिळत नसल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी पंढरपूर-कराड मार्गावर कोर्टी महादेव मंदिराजवळ रास्तारोको आंदोलन केले. त्यानंतर वीज वितरणकडून सिंगल फेज वीजपुरवठा सुरू केला. तसेच थ्रीफेज वीजपुरवठा येत्या आठ दिवस सुरू करत असल्याचे लेखी पत्र आंदोलक शेतकऱ्यांना दिले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश आले आहे. कोर्टी (ता. पंढरपूर) परिसरात येडगे-मुसलमान वस्ती, गवळी वस्ती, टाकावस्ती, फाटेवस्तीसह वाड्या-वस्त्यांवर गेल्या तीन महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू होता. भगिरथ योजनेचा अखंडित वीजपुरवठा मिळत नसल्याने ग्रामस्थ हैराण होते. तसेच कॅनॉल, विहीर, बोअरला मुबलक पाणी असून ते विजेअभावी पिकांना देता येत नसल्याने शेकडो हेक्टरवरील पिके धोक्यात आली होती. तर परिक्षेची कालावधी असताना विजेअभावी विद्यार्थ्यांना अभ्यास करता येत नसल्याने त्यांच्यातून विजवितरणच्या कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली जात होती. वीज वितरण पोलीस प्रशासनाकडून या आंदोलनाला परवानगी देण्यात आली नाही, असे कारण पुढे करत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कराड- पंढरपूर मार्गावर कोर्टी महादेव मंदिरासमोर शेकडो शेतकरी रास्ता रोकोसाठी रस्त्यावर उतरले होते. यावेळी रघु पवार, अनिल कारंडे, अजमेर शेख, राजाभाऊ माळी, सत्यवान मस्के, द्रोणाचार्य हाके, अमीर शेख आदी उपस्थित होते. याबाबत वीज वितरणकडून वेळोवेळी वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करूनही वीज वितरणकडून शेतकऱ्यांची थट्टा करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन पुकारले होते. त्यावरही वीज वितरण पोलीस प्रशासनाकडून या आंदोलनाला परवानगी देण्यात आली नाही, असे कारण पुढे करत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकरी आंदोलनावर ठाम राहताच वीज वितरण, पोलिस व महसूल प्रशासनाने समन्वय साधत वीजपुरवठा तातडीने सुरू केला. येत्या काही दिवसात सुरू करण्याचे लेखी पत्र दिले आहे. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर