ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

गावही कूस बदलतेय:काळाच्या ओघात गावरान आंबे नष्ट; आडी अन् सुवासही झाला दुर्मीळ

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शेतातील बांधावरची जुनी मोठाली गावरान आंब्याची झाडे काळाच्या ओघात नष्ट झाल्याने गावरान आंबा, त्याच्या ‘आडी’ आणि सुगंधही दुर्मिळ झाला आहे. पूर्वी सर्रास शेतकऱ्यांच्या बांधावर अथवा शेतात नैसर्गिक रित्या उगवण झालेली मोठी आंब्याची झाडे असायची. गावोगावी ठराविक भाग आमराई म्हणून ओळखला जायचा. मात्र काळाच्या ओघात विभक्त कुटुंब पद्धतीमुळे शेतीचेही विभाजन होऊ लागले, परिणामी विभागून आलेल्या जमिनीत लागवड केलेल्या इतर पिकास अडचण निर्माण होऊ लागल्याने काही शेतकऱ्यांनी ती काढून टाकली अथवा नैसर्गिक रित्या त्याच्या खोडात किडीचा प्रादुर्भाव होऊन ती नष्ट झाली. गावरान आंब्याची झाडे जेव्हा अस्तित्वात होती, तेव्हा घरोघरी त्याच्या ज्वारीचे पाचट अथवा उसाचे पाचट आणून ‘आडी’ लावल्या जायच्या. त्या घरासमोरून गेले अथवा घरात प्रवेश केला की आंब्याचा सुगंध दरवळायचा. घरासमोर अनेक मुलं मुली आपल्या नातलग मित्र मैत्रिणी समवेत आडीतील पिकलेल्या आंब्याची डाल घेऊन खात बसलेले चित्र दिसून यायचे; मात्र आता गावरान आंबेच राहिले नसल्याने हे चित्र दिसून येत नाही. संकरित आंब्याची कितीही मुबलकता आली असली तरी शेतात नैसर्गिक रित्या उगवण झालेल्या गावरान आंब्याचा आमरस आणि त्याचा सुगंध मात्र दुर्मिळ झाला असून तो आंबा चाखण्याची एक वेगळीच मजा असायची. अनेक शेतकरी विक्रीसाठी नाही तर सुट्टीत आलेल्या पै-पाहुण्यांकरता आंब्याच्या खास आडी लावत असत. मात्र अलीकडील काळात गावरान आंब्याची झाडे कमी झाली, गावरान आंबा दुर्मिळ झाला, संकरित आंबे बाजारात व शेतकऱ्यांकडे सहज उपलब्ध होऊ लागल्याने घरोघरी लागणाऱ्या आंब्याच्या आडी आता लुप्त होऊ लागल्या आहेत.ऊ लागल्या आहेत. ग्रामीण भागात पूर्वी शेतकरी आपल्या शेतातील गावरान आंब्याच्या झाडास पाड लागला की ते कुडीद्वारे झाडावरून उतरवून घरी उसाच्या पाचटात त्या आंब्याची आडी लावत. बिगर रासायनिक प्रक्रियेद्वारे ते आंबे पिकत असत. पिकल्यानंतर ते डालीत भरून गावच्या हाटवटी, चौकापासून ते गावोगावच्या आणि तालुक्याच्या बाजारात विक्री करायचे. गावरान आंब्यास जास्त मागणी असायची. अलीकडील काही काळात शेतकरी सध्या गावरान आंब्यापेक्षा सध्या नर्सरीत उपलब्ध असलेल्या तोतापुरी, केशर, पायरी या विविध संकरित आंब्याच्या वानांची लागवड करत असून उंचीला कमी, जागा जास्त न व्यापणारे, फळे तोडणीला सोपे, अल्पावधीत लवकर फळे चाखायला मिळत असल्याने शेतकऱ्यांची त्यास पसंती आहे.अनेक शेतकरी विक्रीसाठी नाही तर सुट्टीत आलेल्या पै-पाहुण्यांकरता आंब्याच्या खास आडी लावत असत. बिगर रासायनिक प्रक्रियेची जागा बाजाराने घेतली

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर