ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

नाशिकमध्ये भाजपचे दोन उमेदवार भिडले:पत्नीसह आलेल्या उमेदवारावर हल्ला; विभागीय कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नाशिकमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असताना गोंधळ बघायला मिळाला. देवानंद बिरारी त्यांच्या पत्नीसह जेव्हा अर्जाच्या संदर्भात विभागीय कार्यालयात आले तेव्हा एका उमेदवाराने त्यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे इथे पोलिसांची तसेच यंत्रणांची तारांबळ उडल्याचे पाहायला मिळाले. नाशिकमध्ये पुन्हा एकदा दोन भाजपच्या उमेदवारांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला आहे. नाशिकच्या प्रभाग 31 ड येथील दोन उमेदवारांमध्ये संघर्ष झाल्याचे समजते. भाजपचे उमेदवार बाळकृष्ण शिरसाट व देवानंद बिरारी यांच्यात संघर्ष झाला. तसेच देवानंद बिरारी यांच्या पत्नी यांनी बाळकृष्ण शिरसाट यांना कोणीही मतदान करू नये, असे प्रसार माध्यमांसमोर येत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसरीकडे बाळकृष्ण शिरसाट यांनी आमच्यात कोणताही वाद झालेला नसल्याचे म्हटले आहे. या सगळ्या गोंधळानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत उमेदवारांना बाहेर काढल्याचे पाहायला मिळाले. नाशिकच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या परिसरात काही काळासाठी गोंधळ निर्माण झाला होता. उमेदवारी अर्ज दाखल करत असताना देवानंद बिरारी आणि त्यांच्या पत्नीवर अचानक हल्ला करण्यात आल्याचा दावा बिरारी यांनी केला आहे. तर असा कोणताही वाद झाला नसल्याचे बाळकृष्ण शिरसाट यांनी म्हटले आहे. एकंदरीतच नाशिकमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या नाट्यमय घटना गेल्या काही दिवसांत पाहायला मिळाल्या आहेत. त्यात आता आजच्या घटनेची भर पडली आहे. नाशिकमधील महापालिकेची निवडणूक चांगलीच चुरशीची होणार असल्याचा अंदाज यावरून आपण लाऊ शकतो. दहिसरमध्ये सुनीता राम नगीना यादव यांचा उमेदवारी अर्ज मागे दरम्यान, तिकडे दहिसरमध्ये भाजपच्या माजी बंडखोर नगरसेविका सुनीता राम नगीना यादव यांनी आज वॉर्ड क्रमांक 1 मधून शिवसेना-भाजप संयुक्त उमेदवार रेखा राम यादव यांच्या समर्थनार्थ आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. दहिसरच्या भाजप आमदार मनीषा चौधरी आणि माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी माजी नगरसेविका सुनीता रमणगीना यादव यांना उमेदवारी मागे घेण्याचे निर्देश दिले. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी बंडखोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिल्याचे वृत्त आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर