ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

भाजपने सुधीर मुनगंटीवारांना नेहमीच ताकद दिली:मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधान; चंद्रपूरच्या पराभवावर करणार आत्मचिंतन

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपच्या पराभवानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षावर सडकून टीका केली आहे. त्यामुळे भाजपने आता त्यांच्याशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. चंद्रपुरात जे काही घडले त्यावर नक्कीच आम्हाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. सुधीर मुनगंटीवार तेथील पराभवाचा संबंध मंत्रिपदाशी जोडत आहेत. त्यांची भावना योग्य आहे. पण मंत्रिपद नसणे व पराभव होणे यात कोणताही थेट संबंध नाही. या प्रकरणी मुनगंटीवारांशी सवाद साधला जाईल, असे भाजप नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला दैदिप्यमान यश मिळाले. पण चंद्रपूर जिल्ह्यात पक्षाचा दारुण पराभव झाला. येथे काँग्रेसचे 11 पैकी 8 जागांवर नगराध्यक्ष निवडून आले. यामुळे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षश्रेष्ठींवर सडकून टीका केली. काँग्रेसने चंद्रपूर जिल्ह्यातील त्यांच्या नेत्यांना ताकद दिली. पण आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी कुणाचे नाव घेतले नाही. पण त्यांचा रोख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता. याविषयी राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली असताना आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणी मुनगंटीवारांशी संवाद साधण्याचे सूतोवाच केले आहे. काय मंत्री चंद्रशेखर बावनकुळे? बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री व पक्ष नेतृत्वाने सुधीर मुनगंटीवार यांना नेहमीच ताकद दिली आहे. ते पुढेही देतील.

चंद्रपूर जिल्ह्यात जे काही घडले त्यावर आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मुनगंटीवार तेथील पराभवाचा संबंध मंत्रिपदाशी जोडत आहेत. त्यांची भावना योग्य आहे. पण मंत्रिपद नसणे व पराभव होणे यात कोणताही थेट संबंध नाही. भाजप चंद्रपूर विषयी निश्चितच आत्मचिंतन करेल. प्रसंगी सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संवाद साधला जाईल. एकनाथ शिंदेंची कामगिरी ठाकरेंहून सरस ते पुढे म्हणाले, प्रस्तुत निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचा परफॉर्मन्स उद्धव ठाकरे यांच्याहून 10 पट जास्त चांगला आहे. मी मागील 30 वर्षांपासून निवडणूक लढवत आहे.

शिंदे जशी कामगिरी करत आहेत, तशी कामगिरी उद्धव ठाकरे यांना आमच्यासोबत असताना कधीच करता आली नाही. आगामी काळात अजित पवारांच्या पक्षासोबत काही ठिकाणी युती होईल व काही ठिकाणी होणार नाही. पण त्यांच्याशी युती न होण्याचे कारण मुस्लिम मतांचे विभाजन करणे हे अजिबात नाही. कार्यकर्त्यांचे हित डोळ्यापुढे ठेवून यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल.

दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत सर्व 29 महापालिकांत युती करण्याची चर्चा सुरू आहे. शिवसेनेशी सर्वच ठिकाणी युती होईल. त्याची घोषणा लवकरच केली जाईल. संजय राऊतांचाही घेतला समाचार चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण सोडून निवडणूक लढवण्याच्या संजय राऊत यांच्या आव्हानावरही भाष्य केले. या प्रकरणी त्यांनी राऊतांचा चांगलाच समाचार गेतला.

संजय राऊत एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण सोडण्यासंदर्भात कसे काय बोलू शकतात? त्यांना काय अधिकार आहे? धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना संविधानाने दिला आहे, असे ते म्हणाले. हे ही वाचा… मुंढवा भूखंड घोटाळ्यात मोठा ट्विस्ट:पॉवर ऑफ अटॉर्नीवर पार्थ पवार, तेजवानीच्या सह्या; अंजली दमानिया, कुंभारांनी समोर आणले दस्तऐवज
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित मुंढवा भूखंड घोटाळ्यात एक नवा ट्विस्ट आला आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया व विजय कुंभार यांनी या प्रकरणी पार्थ पवार व शितल तेजवानी यांच्यात झालेल्या पॉवर ऑफ अटॉर्नी (मुखत्यारपत्र) व्यवहाराशी संबंधित महत्त्वाचे दस्तऐवज समोर आणले आहेत. या दस्तऐवजांवर दोन्ही पक्षांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यामुळे पार्थ पवार यांच्या अडचणींत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर