ब्रेकिंग न्यूज
⚡ शेताच्या बांधावरून थेट रुपेरी पडद्यावर! वेगावच्या अजय बदकी यांची ‘हुंकार’मधून दमदार एन्ट्री! ✦ ⚡ दुष्काळात बीडच्या शेतकऱ्यानं करून दाखवलं, 500 रुपयांच्या खर्चात मिळवलं तब्बल 32 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन, … ✦ ⚡ लेकीच्या सुखासाठी कर्ज काढलं, पण जावई निघाला…, लग्नानंतर 4 महिन्यांत सगळं संपलं, संजनाचा आईला शेवटचा फोन … ✦ ⚡ Pawanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाला नवं वळण! पद्मसिंह पाटलांचा पाय खोलात? CB… ✦ ⚡ CRIME : फेसबूक LIVE सुरू असताना थरारक हत्याकांड! मेडिकल स्टोअरबाहेर पेटला वाद अन् ‘स्टिंग ऑपरेशन’ करताना झा… ✦ ⚡ Success Story : शेती करावी तर अशी, तीन पिकातून बीडच्या शेतकऱ्याचं पालटलं नशीब, वर्षाला 8 लाख कमाई, Video ✦ ⚡ IAS Tukaram Mundhe : MPSC चौकशी समितीवर नियुक्ती अन् FDA मधून बदलीची चर्चा; अखेर तुकाराम मुंढेंनी मौन सोडलं… ✦ ⚡ शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! कर्जमाफीच्या तिसऱ्या यादीत नाव असेल तर लगेच करा हे काम ✦ ⚡ Kolhapur Crime: एकत्रच जीव देणार होतो पण…, प्रियकराचा शॉकिंग खुलासा, कोल्हापूरला हादरवणाऱ्या प्रकरणात नेम… ✦ ⚡ Dhruv Rathee : मॅकेनिकल इंजीनियरिंग ते जर्मनीत उच्च शिक्षण! पाहा कसा आहे ध्रुव राठीचा शैक्षणिक प्रवास
SP News Maregaon

मुंबईत मान्सूसपूर्व पावसाच्या सरी:उकाड्यामुळे हैरान झालेल्या जनतेला दिलासा, हिंगोली, सोलापुरातही सरी; विदर्भातील उष्णतेची लाट कायम

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


गत काही दिवसांपासून वाढत्या तापमानाने मुंबईकरांच्या अंगाची अक्षरशः लाही – लाही होत होती. अल निनोच्या प्रभावामुळे यंदा मुबलक पाऊसपाणी होणार किंवा नाही? या चिंतेने नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. लोक चातक पक्षाप्रमाणे पावसाची वाट पाहत होते. त्यातच आज सकाळी मुंबईतील काही भागांत मान्सूनपूर्व सरींनी हजेरी लावल्यामुळे उकाड्यामुळे हैरान झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, विदर्भात उष्णतेची लाट अजून कायम असून, नागरिकांना अजूनही उन्हाच्या तीव्र झळांचा सामना करावा लागत आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, मुंबईत सध्या वाढत्या तापमानाने कहर केला आहे. काल येथील तापमान 36 अंश सेल्सिअसच्या आसपास होते. अगोदरच दमट वातावरण आणि त्यात या वाढत्या ताममानामुळे नागरीक अक्षरशः हैरान झाले होते. पण आज सकाळी पावसाने मुंबईतील मुलुंड, घाटकोपर, कांजूरमार्ग, भांडुप आदी भागांतहजेरी लावली. सकाळच्या वेळी अचानक झालेल्या या पावसामुळे चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पण काही वेळ बरसलेल्या पावसाच्या या मान्सूनपूर्व सरींमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. हवामान खात्याने पुढील 36 ते 48 तासांत अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे उकाडा काहीअंशी कमी होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण मध्य महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. पुढील काही दिवसांत या भागांतही पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी वारे 26 मे च्या आसपास केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते टप्प्याटप्याने पुढे सरकत जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रथम मुंबई व त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचू शकतात. हिंगोली, सोलापुरात काही ठिकाणी पाऊस दुसरीकडे, हिंगोली व सोलापूर जिल्ह्यातील काही भागांत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. यामुळे या भागांत आल्हाददायक वातावरण तयार झाले आहे. हिंगोलीच्या वसमत शहरासह तालुक्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली, पण शेतीचे काहीअंशी नुकसान झाले. तिकडे सोलापुरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यानंतर शहरातील काही भागांत पावसाच्या रिमझिम सरी कोसळल्या. सोलापुरात मागील दीड महिन्यांपासून पारा 40 डिग्रीच्या पुढेच आहे. त्यामुळे आजच्या तुरळक पावसामुळे अबालवृद्ध सुखावून गेले. विदर्भातील उष्णतेची लाट कायम दरम्यान, विदर्भातील उष्णतेची लाट अद्यापही कायम आहे. येथील काही जिल्ह्यांना पुढील 3 दिवस उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. प्रशासनाने या प्रकरणी जनतेला योग्य ती काळजी घेण्याचेही आवाहन केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर