ब्रेकिंग न्यूज
Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण … IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही… Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं महायुती सरकारची मोठी घोषणा, तब्बल 30209 जागांसाठी जम्बो शिक्षक भरती, असा करा अर्ज! मोबाईलवर तो मेसेज आला अन् तिथंच बिझनेसमन फसला, छ. संभाजीनगरात अडीच तासांचा थरार, शेवटी… पोलीस भरतीचं स्वप्न अधूरंच राहिलं, धावण्याचा सराव करताना खाली कोसळला अन् घेतला शेवटचा श्वास शफीकचं शतक, साजिदची घातक बॉलिंग, पाकिस्तानचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय, WTC टेबलही हललं! एल निनोच्या पार्श्वभूमीवर मारेगाव तालुक्यात शेततळ्यांची वाटचाल द्राक्षाने बुडवलं, डाळिंबाने केलं मालामाल! शेतात असं टेक्निक वापरून सोलापूरच्या शेतकऱ्याने कमावले 42 लाख! Solapur: माझे फॉलोअर्स का कमी केले? इन्स्टा रिल्सवरून बिनसलं, तरुणासोबत भयंकर…, ‘त्या’ दाव्याने पोलिसही च…
SP News Maregaon

मराठवाड्यात महायुतीचा दबदबा कायम:सुहास शिरसाठांचा दणदणीत विजय; अंबादास दानवेंना मोठा धक्का

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


छत्रपती संभाजीनगर–जालना विधान परिषद निवडणुकीत भाजपचे महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाठ यांनी मोठा विजय मिळवत महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागले असताना निकालात महायुतीने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. सुहास शिरसाठ यांनी पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये तब्बल 455 मते मिळवत विजय मिळवला. तर महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश लोखंडे यांना 134 मते मिळाली. अपक्ष उमेदवार इसाक संदूक खान यांना 35 मते मिळाली असून, निवडणुकीत शिरसाठ यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. या निवडणुकीत एकूण 630 मतदारांनी मतदान केले. पाच मते बाद ठरल्यामुळे मतमोजणीत निर्णायक आकडेवारी बदलली नाही आणि महायुतीचा विजय अधिक स्पष्ट झाला. अंबादास दानवेंना मोठा धक्का, 2018 ची पुनरावृत्ती नाही या निवडणुकीकडे विशेष लक्ष होते कारण ही जागा पूर्वी शिवसेनेकडे होती. 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत तत्कालीन शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला होता. मात्र यंदा राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपने दोन्ही जिल्ह्यांत आपली ताकद वाढवत शिवसेनेला मागे टाकले, आणि त्याचा थेट परिणाम या निवडणुकीत दिसून आला. भाजपची रणनीती ठरली निर्णायक छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन्ही ठिकाणी भाजपने गेल्या काही वर्षांत स्थानिक सत्ता मजबूत केली होती. महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतींमध्येही भाजपने महत्त्वाची पदे स्वतःकडे ठेवली होती. जालन्यात भाजपने स्वबळावर सत्ता स्थापनेत महत्त्वाची पदे मिळवली होती, तर संभाजीनगरमध्येही उपमहापौर पद वगळता महापौर आणि स्थायी समिती सभापती पदावर भाजपचे वर्चस्व राहिले होते. याच संघटनात्मक ताकदीचा फायदा या विधान परिषद निवडणुकीत झाल्याचे स्पष्ट दिसते. या निकालातून मराठवाड्यात भाजपचा वाढता प्रभाव आणि महायुतीचे मजबूत संघटन पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. दुसरीकडे, शिवसेना (उबाठा) आणि महाविकास आघाडीला स्थानिक पातळीवर मोठी झुंज द्यावी लागणार असल्याचेही या निकालाने स्पष्ट केले आहे. महायुतीच्या या विजयामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी राजकीय समीकरणे अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. विधान परिषदेच्या 17 जागांचा निकाल 1) छत्रपती संभाजीनगर-जालना- सुहास शिरसाट- भाजप 2) धाराशिव-लातूर- बीड- बसवराज पाटील, भाजप 3) नांदेड- अमर राजूरकर, भाजप 4) सोलापूर- राजेंद्र राऊत, भाजप 5) नागपूर- राजीव पोतदार, भाजप 6) भंडारा- गोंदिया- अविनाश ब्राह्मणकर, भाजप 7) अमरावती- प्रवीण पोटे, भाजप 8) जळगाव- नंदकिशोर महाजन, भाजप 9) सांगली- सातारा- धैर्यशील कदम, भाजप 10) परभणी- हिंगोली- सईद खान, शिवसेना 11) नाशिक- गोकुळ गिते, (अपक्ष) भाजपचे बंडखोर उमेदवार सहा उमेदवार बिनविरोध 12) ठाणे – रवींद्र फाटक – शिवसेना, (बिनविरोध) 13) यवतमाळ – दुष्यंत चतुर्वेदी – शिवसेना, (बिनविरोध) 14) रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे – राष्ट्रवादी काँग्रेस, (बिनविरोध) 15) पुणे – विक्रम काकडे – राष्ट्रवादी काँग्रेस, (बिनविरोध) 16) वर्धा – गडचिरोली – चंद्रपूर – अरुण लखाणी – भाजप, (बिनविरोध) 17) अहिल्यानगर – प्राजक्त तनपुरे – भाजप, (बिनविरोध) संबंधित बातमी वाचा… विधान परिषद निवडणूक निकाल:महायुतीचा 16 जागांवर विजय, नाशिकमध्ये गोकुळ गितेंचा शिवसेनेला धक्का; महाविकास आघाडीचा सुपडा साफ महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा संपूर्ण निकाल अखेर जाहीर झाला आहे. १८ जून रोजी पार पडलेल्या या निवडणुकीत महायुतीने आपला वरचष्मा कायम राखत १७ पैकी तब्बल १६ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र, नाशिकच्या जागेवर महायुतीला मोठा धक्का बसला असून, तिथे अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी महायुती आणि शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव केलाय. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. वाचा संपूर्ण बातमी नाशिकमध्ये महायुतीला दणका! गोकुळ गीतेंचा दणदणीत विजय:क्रॉस व्होटिंगची चर्चा, दराडेंचा संताप, राऊत-महाजन आमनेसामने नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर झाला असून महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. भाजपमधून बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी कायम ठेवणारे गोकुळ गिते यांनी पहिल्याच फेरीत विजयाचा कोटा पार करत दणदणीत विजय मिळवला. या निकालामुळे महायुतीत खळबळ उडाली असून क्रॉस व्होटिंग, अंतर्गत नाराजी आणि विश्वासघाताच्या चर्चांना उधाण आले आहे. वाचा संपूर्ण बातमी

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर