ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

जागतिक पातळीवर पंतप्रधान ‘रिजेक्ट माल’!:कॉंग्रेस नेते नाना पटोलेंची नरेंद्र मोदींवर टीका, म्हणाले- त्यांच्यामुळे देशाची मान शर्मेने खाली गेली

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी तरुण पिढीचा उल्लेख ‘कॉकरोच’ असा केल्याच्या पार्श्वभूमीवर आणि सोशल मीडियावर सुरू असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या ट्रेंडचा संदर्भ देत, काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. देशाच्या तरुण पिढीला अशा प्रकारची उपमा दिली जाणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत, तरुणांचा सातत्याने होणारा अपमान आणि वाढती बेरोजगारी यामुळेच आजच्या तरुण वर्गात केंद्र सरकारविरोधात तीव्र असंतोष खदखदत असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले. नाना पटोले म्हणाले, देशातील सुशिक्षित तरुण-तरुणी आणि पदव्युत्तर पदव्या घेऊनही बेरोजगार बसले आहेत. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून कधी त्यांना पकोडे तळण्याचा सल्ला दिला जातो, तर कधी इतर गोहस्ति सांगितल्या जातात. तरुणांचा हा पदोपदी होणारा अपमान आता त्यांच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेला आहे. पंतप्रधानांमुळे जागतिक पातळीवर देशाची मन शर्मेने खाली गेली आहे. जागतिक पातळीवर पंतप्रधान रिजेक्ट माल आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. मोदींच्या परदेश दौरे आणि त्यात होणाऱ्या घडामोडींवरून नाना पटोले यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, देवेंद्र फडणवीस नेहमी सांगतात की, पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांमुळे देशाचा फायदा होतो, अनेक महत्त्वपूर्ण करार केले जातात. मात्र, आता फडणवीसांनीच यावर उत्तर दिले पाहिजे की, इटलीमध्ये जाऊन तिथल्या महिला राष्ट्राध्यक्षांना चॉकलेटची भेट देणे कितपत योग्य आहे? पंतप्रधानांचे हे वर्तन हास्यास्पद असल्याची टीका पटोले यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांच्यावर रिजेक्ट माल म्हणून देवेंद्र फडणवीसांनी टीका केली होती. त्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, जे राहुल गांधींना रिजेक्ट माल म्हणत होते, त्यांनी आता पहावे की, त्यांचे स्वतःचे पंतप्रधान आज जागतिक पातळीवर रिजेक्ट माल ठरत आहेत. पंतप्रधानांच्या अशा कृतींमुळे देशाची प्रतिष्ठा धुळीस मिळत आहे. पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांमुळे देशावर मोठ्या प्रमाणावर आर्थिक भार पडत असून, या दौऱ्यांमधून देशाच्या पदरात काय पडले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर