ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

पंढरपुरात हायव्होल्टेज ड्रामा:रोहित पवारांच्या आंदोलनानंतर भाजप आक्रमक; शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांमुळे विठ्ठलनगरी अशुद्ध झाली म्हणत गोमूत्र शिंपडलं

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या पंढरपूर येथील आंदोलनस्थळी आज भाजप कार्यकर्त्यांकडून थेट गोमूत्र आणि चंद्रभागेचे तीर्थ शिंपडून ‘शुद्धीकरण’ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळवणवार यांनी हा प्रकार केला आहे. सरकारी कारखाने, बँका आणि दूध संघ डबघाईला आणणाऱ्या लोकांच्या आंदोलनामुळे विठ्ठलाची पंढरी अशुद्ध झाली होती, तसेच या आंदोलनामुळे मोठी वाहतूक कोंडी होऊन भाविकांची गैरसोय झाली, असा आरोप करत भाजपने हे ‘गोमूत्र शुद्धीकरण’ नाट्य घडवून आणले. रोहित पवारांवर कर्माचा हिशोब उलटला- भाजप नेत्याचा घणाघात या संपूर्ण प्रकारावर भाजप अहिल्यानगर दक्षिणचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन पोटरे यांनी प्रतिक्रिया देत रोहित पवारांवर जोरदार निशाणा साधला. “राजकारणात कर्माचा हिशोबकधी ना कधी चुकता करावाच लागतो, हे आज सिद्ध झाले, असे पोटरे म्हणाले. त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील एका जुन्या घटनेची आठवण करून दिली. त्या वेळी कर्जत नगरपंचायत निवडणुकीत सत्तेचा गैरवापर करून भाजप उमेदवारांवर दबाव आणला गेला होता. त्याचा निषेध म्हणून भाजप नेते राम शिंदे यांनी कर्जत येथील धाकटी पंढरी समजल्या जाणाऱ्या गोदड महाराज मंदिरासमोर ‘मौन व्रत’ आंदोलन केले होते. रोहित पवारांच्या जुन्या ‘स्टंट’ची झाली पुनरावृत्ती- सचिन पोटरे सचिन पोटरे यांनी पुढे सांगितले की, राम शिंदे यांचे आंदोलन संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमदार रोहित पवार यांच्या सांगण्यावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोदड महाराज मंदिर परिसरात गोमूत्र शिंपडून ‘पवित्र’ करण्याचा स्टंट केला होता. आज तेच कर्म फिरून रोहित पवारांवर उलटले आहे. नेहमी शेतकरी विरोधी भूमिका घेणाऱ्या आणि शेतकऱ्यांचे कारखाने हडप करणाऱ्या रोहित पवारांनी पंढरपुरात जिथे उपोषण केले, त्याच जागेवर आज भाजप नेते माऊली हळवणवार यांनी गोमूत्र शिंपडून त्या जागेचे शुद्धीकरण केले आहे. संतांच्या भूमीत राजकीय संघर्ष राजकारणात जय-पराजय, आरोप-प्रत्यारोप आणि संघर्ष सुरूच राहतात, मात्र संतांची भूमी, श्रद्धास्थाने आणि जनभावनांचा आदर राखणे हे सर्वच राजकीय नेत्यांचे कर्तव्य आहे. काळ बदलतो, परिस्थिती बदलते; पण कर्माचे फळ मात्र प्रत्येकाला कधी ना कधी भोगावे लागते, असा टोला भाजप नेत्यांनी रोहित पवारांना लगावला. पंढरपुरातील या गोमूत्र शिंपडण्याच्या प्रकारामुळे आता महाविकास आघाडी आणि महायुतीमधील राजकीय वाद आणखी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर