ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

राष्ट्रवादी काँग्रेस सोडून दुसरा पर्याय निवडेन, पण भाजपसोबत जाणार नाही:रोहित पवारांच्या विधानाने खळबळ; विलिनीकरणावर शरद पवार गटाला स्पष्ट इशारा

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात जोर धरत असतानाच आता आमदार रोहित पवार यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येतील आणि शरद पवार गट एनडीएसोबत सत्तेत सहभागी होऊ शकतो, अशा चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षातील वरिष्ठ नेते, आमदार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत दोन्ही राष्ट्रवादींच्या संभाव्य विलिनीकरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष नेतृत्वाकडे थेट भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती. विलिनीकरण होणार की नाही, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असल्याचेही काहींनी सांगितले. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाचे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांनी स्पष्ट शब्दांत पक्षाची भूमिका मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कोणतेही विलिनीकरण होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत शरद पवार उपस्थित असले तरी त्यांनी स्वतः या मुद्द्यावर कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, त्यांच्या उपस्थितीतच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या सर्व घडामोडींमध्ये रोहित पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे. मुलाखतीदरम्यान त्यांना पक्षाच्या भूमिकेबाबत आणि सरकारविरोधातील आक्रमकतेबाबत प्रश्न विचारण्यात आला. राष्ट्रवादी शरद पवार गटातील अनेक नेते सरकारविरोधात फारसे आक्रमक दिसत नसल्याने अजूनही मागच्या दाराने चर्चा सुरू असल्याचा संशय लोकांमध्ये असल्याचे त्यांना सांगण्यात आले. तसेच भविष्यात पक्षाने विलिनीकरण करून एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर तुमची भूमिका काय असेल? असा थेट प्रश्न रोहित पवार यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना रोहित पवार यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. जर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने विलिनीकरण करून एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तर मी दुसरा पर्याय निवडेन. पण भाजपसोबत जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद, संभाव्य राजकीय समीकरणे आणि भविष्यातील आघाड्यांबाबत आता पुन्हा एकदा तर्कवितर्क रंगू लागले आहेत. काँग्रेससोबत जाणार का? रोहित पवार यांच्या विधानानंतर त्यांना दुसरा पर्याय म्हणजे काँग्रेससोबत जाणार का? असा प्रश्नही विचारण्यात आला. मात्र, या प्रश्नावर त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. मी दुसरा पर्याय निवडेन, पण भाजपसोबत जाणार नाही, एवढेच ते म्हणाले. त्यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीतील समीकरणे, राष्ट्रवादीतील भविष्यातील घडामोडी आणि आगामी राजकीय दिशा याबाबत चर्चा अधिक तीव्र झाली आहे. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण कोणते वळण घेते, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर