ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

विहिरीच्या कामावरून तलवार, काठ्यांनी तुंबळ हाणामारी:4 जणांविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हिंगोली तालुक्यातील पिंपळखुटा शिवारात विहिरीच्या कामावरून एकाच कुटुंबातील चौघांना मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात चौघांवर शुक्रवारी ता. 12 गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गारमाळ येथील युसुफ भिका नंदावाले यांचे पिंपळखुटा शिवारात शेत आहे.या शेतात विहिरीचे काम करण्यात आले आहे. मात्र मजूरांच्या कारणावरून युसुफ यांचा कासम नंदावाले याच्यासोबत वाद झाला. यावेळी कासम याने तु विहीरीच्या कामावरील मजूरांना आमच्या शेतातील विहीरीचे काम लवकर का करू दिले नाही या कारणावरून शिवीगाळ करण्यास सुरवात केली. दोघांमधील शाब्दिक चकमकीनंतर वाद वाढत गेल्याने दोन्ही कुटुंब समोरा समोर आले. यावेळी लोखंडी रॉड, काठ्या, तलावारीने हाणामारी झाली. या मारहाणीत युसुफ हे जखमी झाले. तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेल्या युसुफ यांच्या पत्नी व मुले रफीक व फेरोज मध्ये पडले असता त्यांनाही मारहाण करून जखमी करण्यात आले. तसेच विहीरीच्या कामावरील मजूरांना देण्यासाठी आणलेले 30 हजार रुपेय कासम व इतरांनी काढून घेतले. या मारहाणीत जखमी झालेल्या चौघांना उपचारासाठी हिंगोलीच्या लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी युसुफ नंदावाले यांच्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलिसांनी कासम नंदावाले, शकील नंदावाले, रज्जाक नंदावाले आणि आसिफ नंदावाले यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, उपनिरीक्षक राहुल घुले, जमादार बाळासाहेब खोडवे पुढील तपास करत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर