ब्रेकिंग न्यूज
मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं
SP News Maregaon

यंत्रणा ओव्हरलाेड:विजेची मागणी 200 मेगावॅटने वाढली; लोकांना अघोषित भारनियमनाचा “शॉक’

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तापमानाचा पारा ४० अंश सेल्सियसवर कायम आहे. उन्हाच्या तीव्रतेने नागरिक होरपळून निघत असतानाच विजेची मागणी २०० मेगावॅटने वाढली आहे. एरव्ही दररोज १००० ते १२०० मेगावॅट विजेची गरज भासते पण गेल्या काही दिवसांत ही मागणी १३०० ते १५०० मेगावॅटवर पोहोचली. महावितरण भारनियमन नसल्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात नागरिकांना मात्र अघोषित भारनियमनाचा “शॉक’ बसत आहे. मेच्या सुरुवातीलाच तापमानाने चाळीशी गाठली. त्यामुळे घराघरांत, कार्यालयांत एसी, कुलर आणि पंख्यांचा वापर १० टक्क्यांनी वाढला. मागणी आणि पुरवठा यांचे गणित बिघडल्याने ट्रान्सफॉर्मर गरम होणे आणि फ्यूज उडण्याचे प्रकार वाढले आहे. यामुळे संपूर्ण यंत्रणाच “ओव्हरलोड’ झाली आहे. केवळ वीज जाणेच नाही, तर “लो व्होल्टेज’ची समस्याही जिल्ह्याच्या अनेक भागात गंभीर बनली आहे. नगर शहर आणि उपनगरांमध्ये दुपारच्या वेळी एसी आणि कुलरचा वापर वाढल्याने घरगुती वापराच्या विजेचा आलेख उंचावला आहे. ग्रामीण भाग उन्हाळी पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांकडून कृषिपंपांचा वापर वाढला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ग्राहक संगमनेर (३.३३ लाख) आणि नगर ग्रामीण (२.०४ लाख) विभागात असल्याने या भागात तुलनेने विजेची मागणी जाणवत आहे. राज्यात विजेची मागणी ३० हजार ८२१ मेगावॅटवर राज्यभरात दोन आठवड्यांपूर्वी ५ मे रोजी राज्याची विजेची मागणी ३० हजार ८२१ मेगावॉट नोंदवली. महावितरणकडून मुंबई वगळता संपूर्ण राज्यात सुमारे पावणेतीन कोटी वीज ग्राहकांना वीज पुरवली जाते. २७ एप्रिलला राज्याची विजेची मागणी ३२ हजार मेगावॉटवर गेली होती. त्यानंतर मे महिन्यात प्रथमच ३० हजार मेगावॉटचा टप्पा ओलांडला. दुपारी १ ते ४ या वेळेत विजेच्या मागणीत मोठी वाढ नोंदवली जात आहे. ^ सध्या विजेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यात कृषिपंपांचा वापर वाढल्याने रात्री ९ ते १० यावेळेत काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित करावा लागतो. मात्र भारनियमन नाही. – योगेश चव्हाण, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी, महावितरण, अहिल्यानगर. अशी करता येईल ४० टक्के विजेची बचत {दुपारी १२ ते ४ या वेळेत एसी/कुलरचा वापर शक्य असल्यास मर्यादित ठेवा. एलइडी बल्बचा वापर करा, ज्यामुळे ४०% पर्यंत वीज वाचू शकते. { इलेक्ट्रिक इस्त्री किंवा वॉटर हिटरचा वापर पीक अवर (सकाळी ८ ते ११ व सायंकाळी ६:३० ते रात्री १० ) सोडून करावा. – सूर्यास्तानंतर रस्त्यांवरील दिवे, दुकानांतील रोषणाई आणि टीव्ही, दिवे, एसी व कुलरचा वापर एकाच वेळी सुरू होतो. या काळात ग्रीडवर सर्वाधिक ताण असतो.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर