ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

निदाची ओळख कुणी करून दिली? या प्रश्नावर मतीनचे माैन:पंधरा दिवसांत 3 वेळा नाशिक पोलिसांकडून चौकशी

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बहुचर्चित कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाला आता खळबळजनक वळण मिळाले आहे. या प्रकरणातील निदा खान हिला आश्रय देणारा एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याची एसआयटीचे सहायक आयुक्त संदीप मिटके यांनी सलग १० तास मॅरेथॉन चौकशी केली. प्रश्नांच्या भडिमारामुळे मतीन घामाघूम झाला. या संपूर्ण चौकशीत पोलिसांनी एकाच प्रश्नावर जोर दिला ‘तुला निदाची ओळख कुणी करून दिली?’ मात्र, या प्रश्नावर मतीनने बराच वेळ मौन बाळगल्याने पोलिसांचा संशय आणखी बळावला आहे. नगरसेवक असलेल्या मतीनला छत्रपती संभाजीनगरहून पंधरा दिवसांत ३ वेळा नाशकात बोलावून प्रश्चांची सरबत्ती करण्यात येत आहे. गुरुवारीही मतीन सकाळी ११ वाजता नाशिक पोलिस आयुक्तालयात हजर झाला. तेथून त्याला अत्यंत गोपनीय पद्धतीने तत्काळ सायबर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. मतीनच्या मोबाइलमधील डिलीट केलेला डेटा आणि काही संशयास्पद चॅट्स समोर ठेवून त्याला बोलते करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिस अधिकाऱ्यांनी जेव्हा तांत्रिक पुरावे समोर ठेवले, तेव्हा त्याचे धाबे दणाणले, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, गरज पडल्यास त्याची पुन्हा चौकशी होऊ शकते, अशीही माहिती समोर येत आहे. निदा प्रश्नावर निरुत्तर या प्रकरणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या निदा खानभोवती तपासाची चक्रे फिरत असून पोलिसांनी ‘थेट निदाशी संपर्क कसा आला?’ या प्रश्नावर वेगवेगळ्या बाजूंनी मतीनला घेरले. एकाच प्रश्नाचा भडिमार होत असल्याने मतीनच्या चेहऱ्यावरील रंग उडाला. त्याने ‘काहीच आठवत नाही, कुणाचा फोन आला हे आठवत नाही’ असे सांगून प्रश्नांची उत्तरे देणे टाळले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर