ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

ग्राउंड रिपोर्ट‎:संभाजीनगरात महापालिकेच्या नागरी मित्र पथकाकडून विशिष्ट रस्त्यावरूनच उचलल्या जातात दुचाकी-चारचाकी

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शहरामध्ये मनपाकडून पार्किंग उपलब्ध करून देण्यात आलेली नसताना रस्त्यावर लावलेली वाहने उचलण्याचा सपाटा मनपाने नियुक्त केलेल्या एजन्सीने लावला आहे. दुचाकी उचलताना अप्रशिक्षित कामगार असल्याने अनेक वाहनांचे नुकसान होते. मनपाचे जवानांकडूनदेखील विशिष्ट्य रस्त्यावरच उभ्या असलेल्या चारचाकी वाहनावर कारवाई केली जात आहे. यामुळे जुने शहर, टीव्ही सेंटर, रोशन गेट, क्रांती चौक, निराला बाजार, चंपा चौक ते मनपा मुख्यालय, शिवाजीनगर, जालना रोड, महावीर चौक या ठिकाणी नियमित वाहतूक कोंडी होत असतानादेखील याकडे मनपा डोळेझाक करत आहे. मॉल आणि धर्मादाय रुग्णालयांडून पार्किंग वसूल न करता मोफत पार्किंग द्यावी. मनपाने त्यांच्या सांगण्यावरून कारवाई करण्याअगोदर मोफत पार्किंग उपलब्ध करून देण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे. 2025 मध्ये मनपाने ठराव घेऊन 2 हजार रुपयांवरून 5 हजार रुपये चारचाकी वाहनासाठी दंड आकारण्याबाबत ठराव घेण्यात आला आहे. नो पार्किंगमधील वाहने गरवारे स्टेडियमवर उचलून नेली जातात. या परिसराच्या जवळपास असलेल्या परिसरातीलच वाहनावर आम्ही कारवाई करत असल्याचे एका नागरी मित्र पथकाच्या जवानाने ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. दिव्य मराठीच्या पाहणीत काय आढळले? हॉस्पिटल, मॉलच्या पत्रावर कारवाई शहरातील प्रोझोन मॉल, एमजीएम हॉस्पिटल, मेडिकव्हर हॉस्पिटल आदी ठिकाणांहून सर्वाधिक वाहने उचलली जातात. दवाखान्यात आलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे ‘दिव्य मराठी’च्या पाहणीत समोर आले. पार्किंगला 10 ते 20 रुपये वाचवण्यासाठी बाहेर वाहने लावणाऱ्या नागरिकांना मनपा 500 ते 2000 हजारांचा भुर्दंड देत आहे. दरम्यान, याविषयी मनपाला विचारणा केली असता या आस्थापनांनी आम्हाला पत्र दिले असल्याने आम्ही उचलत असल्याचे त्यांनी सांगितले. मार्च 2025 मध्ये ॲक्टिव्ह मोटर्सला काम शहरातील पार्किंगला शिस्त लागावी यासाठी मार्च 2025 मध्ये ॲक्टिव्ह मोटर्सला काम देण्यात आले आहे. दुचाकी उचलण्यासाठी तीन वाहने लावली असून प्रत्येक गाडीसोबत महापालिकेचे जवान आहेत. दुचाकी उचलल्यानंतर 500 रुपये शुल्क असून त्यातील 200 रुपये मनपाला, तर 300 रुपये एजन्सीला मिळतात. शहरात जेथे वाहतूक कोंडी तेथे कारवाई विशिष्ट्य भागातून वाहने उचलली जात असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आलेल्या नाहीत. असे असेल तर नागरी मित्र पथकाला सांगून शहरात सर्व ठिकाणी कारवाई करण्यात येईल. वाहतुकीला शिस्त लागणे अत्यंत आवश्यक आहे. -संतोष वाहुळे, संनियंत्रण अधिकारी, अतिक्रमण विभाग

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर