ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

काँग्रेसच्या दोन्ही अध्यक्षांची फेरनिवड:बबलू देशमुख ग्रामीणचे, तर बबलू शेखावत यांची शहर काँग्रेसचे अध्यक्षपदी निवड

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अमरावती काँग्रेसच्या दोन्ही जिल्हाध्यक्षांची फेरनिवड करण्यात आली आहे. बबलू देशमुख यांची ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी तर बबलू शेखावत यांची शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. काँग्रेसचे केंद्रीय सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी गुरुवारी काँग्रेस अध्यक्षांची यादी जाहीर केली. यामध्ये बबलू देशमुख आणि बबलू शेखावत यांच्या नावांचा समावेश आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राबवलेल्या ‘सृजन संघटन अभियान’ अंतर्गत ही निवड प्रक्रिया पार पडली. या अभियानांतर्गत केंद्रीय निरीक्षक हरियाणाचे आमदार अल्ताफ अहमद आणि राज्याचे निरीक्षक आमदार भाई जगताप यांनी गेल्या महिन्यात अमरावतीत तळ ठोकला होता. या काळात त्यांनी पक्षाचे सर्व पदाधिकारी, आजी-माजी आमदार यांच्याशी ‘वन टू वन’ चर्चा केली. इच्छुकांकडून अर्ज दाखल करून घेतल्यानंतर हा अहवाल केंद्रीय नेत्यांकडे पाठवण्यात आला होता. या अहवालात ‘सोशल इंजिनिअरिंग’च्या सूत्रानुसार सर्व संवर्गातील प्रत्येकाचे नाव आणि त्यांना मिळालेला कौल स्पष्ट करण्यात आला होता. त्यानुसार आज दोन्ही अध्यक्षांची नावे घोषित करण्यात आली. दरम्यान, अमरावतीचे खासदार बळवंतराव वानखडे यांनी यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांनी आपण स्पर्धेत नसल्याचे स्पष्ट करत मुलाखतीदरम्यान बबलू देशमुख यांच्याच नावाला पसंती दर्शवली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सर्व चौदाही तालुक्यातून देशमुख यांच्याच नावाला कौल मिळाला होता.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर