ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

महागाव तालुक्यात वादळवाऱ्यासह जोरदार पाऊस:घरावरील पत्रे उडाली

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा कायम असून, आज करंजी व शिरपूर परिसरात पुन्हा जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतीपिकांसह घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. करंजी व शिरपूर परिसरात दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरील टिनपत्रे उडून गेली तर काही घरांच्या भिंती कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. अचानक आलेल्या या संकटामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. वादळाचा फटका वाहनांनाही बसला असून, काही मोटारसायकली तसेच चारचाकी वाहने नुकसानग्रस्त झाली आहेत. झाडांच्या फांद्या तुटून वाहनांवर पडल्याने नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला होता. दरम्यान, शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचेही नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्यामुळे पिके आडवी पडली आहे. भाजीपाला व फळबागांना फटका बसला आहे. सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर