ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

शहरातील 350 दिव्यांगांना मोफत कृत्रिम मॉड्युलर पाय बसवणार:दिव्यांग केंद्र पुणे यांच्या वतीने 14 जून रोजी मोजमाप शिबिराचे आयोजन‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


गेल इंडीया यांच्या सीएसआर सहाय्यता अंतर्गत व भारत विकास परिषदेच्या दिव्यांग केंद्र पुणे यांच्या वतीने आणि श्री चिंतामणेश्वर मठ संस्था, वीरशैव लिंगायत समाज वाशीम जिल्हा यासोबतच आमदार श्याम खोडे यांच्या सहयोगातून स्थानिक स्वागत लॉन येथे येत्या १४ जून रोजी दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम हात, पाय व कॅलिपर मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये ३५० दिव्यांगांना मोफत आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय बसवून देण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच फोनद्वारे पूर्वनोंदणी आवश्यक आहे. या शिबिराचा लाभ जिल्हयातील दिव्यांग बांधवांनी घेण्याचे आवाहन दिव्यांग केंद्राचे प्रमुख विनय खटावकर यांनी पत्रपरिषदेतून केले. मंगळवार, १९ मे रोजी स्थानिक विश्रामगृहात झालेल्या पत्रपरिषदेत आमदार श्याम खोडे, गेल इंडीयाचे संचालक प्रा.डॉ. रविकांत कोल्हे, मोहन बोरगांवकर आदींची उपस्थिती होती. विश्वस्त व दिव्यांग केंद्रप्रमुख विनय खटावकर पुणे यांनी शिबिराच्या संपूर्ण नियोजनाची आणि आधुनिक मॉडयूलर पायाविषयी पत्रकारांना माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, भारत विकास परिषद ही सेवा व संस्कार क्षेत्रात निस्वार्थपणे काम करणारी राष्ट्रव्यापी संघटना आहे. दिव्यांगाना कृत्रिम अवयव बसवणे हा प्रमुख राष्ट्रव्यापी सेवा प्रकल्प आहे. भारतातील १३ दिव्यांग केंद्रांपैकी महाराष्ट्रातील कायमस्वरूपी पुणे येथील दिव्यांग केंद्र गेल्या २५ वर्षांपासून अखंड कार्यरत आहे. भारत विकास परिषदेच्या महाराष्ट्र स्तरावर मोफत दिव्यांग शिबिर घेणाऱ्या दिव्यांग पुनर्वसन केंद्र पुणेतर्फे दरवर्षी सुमारे ५ हजार दिव्यांगांना मोफत कृत्रिम पाय, हात व कॅलिपर बसवण्यात येतात. तसेच सदर दिव्यांग केंद्रातर्फे रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त रा.स्व. संघाचे सरसंघ चालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत एप्रिल २०२५ मध्ये एकाच शिबिरात ८९२ दिव्यांगांना कृत्रिम पाय बसवून जागतिक विक्रम केला आहे. त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली. गेल इंडिया लि. यांच्या सी.एस.आर निधीतून गेली दोन वर्षे मोफत दिव्यांग शिबिरे अमरावती व अकोला येथे आयोजित करण्यात आली होती. मोफत दिव्यांग शिबिर या वर्षी सुद्धा वाशीम येथे घेण्यात येत असल्याची माहिती खटावकर यांनी दिली. पुढे बोलताना ते म्हणाले की, आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पायाची बाजारात ५० हजारापेक्षा जास्त किंमत आहे. मात्र कृत्रिम पाय या शिबिरात ३५० दिव्यांगांना मोफत देणार आहोत. परंपरागत जयपूर फूटपेक्षा हे आधुनिक मॉड्यूलर कृत्रिम पाय ऑटोफोल्ड असून वजनाने हलके आहेत. आपल्या मार्गदर्शनरपर भाषणात जास्तीत जास्त दिव्यांगांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार श्याम खोडे यांनी केले. चिंतामणेश्वर मठ संस्थान व वीरशैव लिंगायत समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते काशिनाथ लाहोरे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. पत्रपरिषदेला प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मिडियाचे बहूसंख्य पत्रकार बांधव उपस्थित होते. कृत्रिम मॉड्यूलर पाय बसवल्याने सर्व कामे शक्य आधुनिक कृत्रिम मॉड्यूलर पाय बसवल्यानंतर दिव्यांग व्यक्ती चालणे, पळणे, पोहणे, उडी मारणे, वाहन चालवणे व शेती कामे इ. प्रकारच्या दैनंदिन क्रिया करू शकतात. त्याबाबत तज्ञांमार्फत त्यांना मार्गदर्शनही केले जात असल्याची माहिती खटावकर यांनी देतांना दिव्यांगांनी ९६५७३४५५४३ व ९८२३१०२८६२ या क्रमांकावर तसेच अकोला अर्बन सह. बँक, वाशीम शाखा, सिंधी कॉलोनी, पाटणी चौकाजवळ येथे प्रत्यक्ष संपर्क करुन नोंदणी करण्याचे आवाहन केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर