ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

गोवंश तस्करी अन् बेकायदेशीर कत्तलखान्यांविरूद्ध ‘मकोका’:वारंवार व संघटित गो-तस्कर टोळ्यांविरोधात बडगा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यात गोवंशाची अवैध वाहतूक आणि बेकायदा कत्तल रोखण्यासाठी गृह विभागाने गुरुवारी कठोर पावले उचलली आहेत. यापुढे वारंवार आणि संघटितरीत्या गोतस्करी करणाऱ्या टोळ्यांवर थेट ‘मकोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या नव्या नियमांची आणि सूचनांची काटेकोर अंमलबजावणी न झाल्यास संबंधित भागाचे पोलिस आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनाच थेट जबाबदार धरले जाईल व त्यांना नियमित आढावा घ्यावा लागेल. वाढत्या घटनांमुळे निर्णय घेण्याची वेळ राज्यात गोवंश तस्करी आणि अवैध वाहतुकीच्या मुद्द्यावरून अनेकदा तणाव निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. या वाढत्या घटना आणि विविध संघटनांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींची गंभीर दखल घेत, या संघटित गुन्हेगारीला मुळासकट मोडून काढण्यासाठी राज्य सरकारने थेट मकोका लावण्यासारखा मोठा निर्णय घेतला आहे. अशी असेल कारवाईची त्रिस्तरीय यंत्रणा सीमावर्ती भागांत संयुक्त नाकेबंदी: परराज्यांतील तस्करी रोखण्यासाठी राज्याच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस, परिवहन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि पशुसंवर्धन विभागाची ‘संयुक्त तपासणी चौकी’ आणि ठिकठिकाणी ‘संयुक्त भरारी पथके’ तैनात केली जातील.
‘डायल ११२’ वरून त्वरित प्रतिसाद: नागरिकांनी ‘डायल ११२’ या हेल्पलाइनवर गोतस्करीची माहिती दिल्यास पोलिस यंत्रणेला त्यावर तात्काळ कारवाई करणे आता बंधनकारक असणार आहे.
स्वतंत्र ‘नोडल अधिकारी’ : सर्व पोलिस अधीक्षक कार्यालये, आयुक्तालये आणि पशुसंवर्धन विभागात स्वतंत्र ‘नोडल अधिकारी’ नियुक्त केले जातील. नागरिकांच्या सोयीसाठी त्यांचे संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिले जातील.
स्थानिक संस्थांची धडक मोहीम: सर्व महापालिका, नगर परिषदा आणि ग्रामपंचायतींनी आपापल्या हद्दीतील अनधिकृत कत्तलखाने शोधून कारवाई करायची आहे. याशिवाय परिवहन विभागाने संशयित वाहनांची नियमित तपासणी करायची आहे.
संविधानातील अनुच्छेद ४८: भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ४८ मधील तरतुदींनुसार गाई, वासरे आणि दुभत्या जनावरांचे जतन व संरक्षण करणे अपेक्षित आहे. याच घटनात्मक आधारावर हे नवे परिपत्रक काढण्यात आले आहे.
पशुवधगृहांसाठी नियम: मुंबई मनपा अधिनियम, १८८८ नुसार धार्मिक कारणांसाठी आयुक्तांच्या लेखी परवानगीने उभारलेल्या तात्पुरत्या पशुवधगृहात स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य व जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापनाचे पालन सक्तीचे राहील.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर